सुधीर जोशी यांचे निधन
राडेबाज शिवसैनिकांमध्ये आपले पांढरपेशेपण जपणारे, सौम्य, मवाळ परंतु खंबीर, निग्रही आणि प्रामाणिक शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या जाण्यामुळे शिवसेनेच्या इतिहासातील एक उज्वल अध्याय संपला आहे.
मुंबई महापौर, आमदार किंवा महसूल मंत्री असले तरी ज्यांना सगळे आपुलकीने सुधीरभाऊ म्हणून हाक मारत, असा तळागाळातील लोकांचा नेता आज आपल्यातून गेला आहे… स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शहरी सुशिक्षितांमध्ये शिवसेना रूजविण्याचे, नेतृत्वाची नवी फळी निर्माण करण्याची फार मोठी कामगिरी भाऊंनी बजावली होती. आणि हे करताना स्वतःच्या व्यक्तीगत स्वार्थापलीकडे जात ते कार्यरत होते. त्यामुळे शिवसेनेच्या तमाम नेते मंडळीमध्ये शिवसेनाप्रमुखांचा सर्वाधिक विश्वास सुधीर भाऊंवर होता आणि म्हणूनच १९९५ मध्ये जेव्हा सेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर येत होते, तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत सुधीर भाऊंवर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पडणार अशी शक्यता होती, पण अखेरच्या काही तासांच्या भेटीगाठींनी अशी काय कलाटणी मारली की सुधीरभाऊंच्या सख्या मामांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली… पण अर्थात सुधीर भाऊंनी त्यांच्या मनातील ही सल कधीच बोलुन दाखवली नाही… सध्याच्या काळात अगदी ग्रामपंचायत सदस्यपद नाकारले तरी बंडखोरी केली जाते, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली तरी शांत राहून काम करणारे आमचे सुधीर भाऊं सारखे नेते विरळाच…
भाऊ… भावपूर्ण श्रध्दांजली !
मुख्यमंत्रीपद गमावूनही शांत राहिलेला राजकारणातील सभ्य माणूस गेला…
श्रद्धांजली
Viaफेसबुक