“दृष्टीबाधितासाठी मुंबईमध्ये अद्ययावत ब्रेल भवन निर्मितीचा प्रयत्न करणार”
नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारी समिती सदस्य डॉ.विजयभाऊ राठी यांचे प्रतिपादन
मिरागी नेत्रालय आणि नॅब, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ
लातूर ११.०३.२०२२
आपल्या देशामध्ये जवळपास एक कोटीच्यावर दृष्टीबाधित व्यक्ती आहेत त्यांचे शिक्षण, पुनर्वसन व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगार, सल्ला मार्गदर्शन, संशोधन, महिला सक्षमीकरण व समुदाय पातळीवरील पुनर्वसनात्मक कार्य नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (इंडिया) मार्फत केले जाते. त्याची स्थापना १९ जानेवारी १९५२ रोजी करण्यात आली असून त्याचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे तेव्हा पुढील काळामध्ये दृष्टीबाधितासाठी मुंबईमध्ये अद्ययावत ब्रेल भवन निर्मितीचा प्रयत्न करणार असे प्रतिपादन नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (इंडिया)चे नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारी समिती सदस्य डॉ.विजयभाऊ राठी यांनी केले.
मिरागी नेत्रालय आणि नॅब, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर नॅबचे उपाध्यक्ष आणि मिरागी नेत्रालयाचे चेअरमन कमांडर कैलास गिरवलकर, उपाध्यक्ष डॉ.ज्योती पाटील, सचिव पुखराज दर्डा, कोषाध्यक्ष सिए तेजमल बोरा, शोभा पाटील, सुरेखा गिरवलकर, डॉ.विजय लड्डा आणि डॉ.शकुंतला लड्डा (अमरावती) यांची उपस्थिती होती
या संघटनेत सन २०२२-२६ या पाच वर्षासाठी नवनियुक्त पदाधिकारी निवडण्यात आले यामध्ये हेमंत टकले हे अध्यक्ष असून ५ उपाध्यक्ष, सचिव म्हणून आनंद आठलेकर, मानद सचिव म्हणून ०६, कोषाध्यक्ष म्हणून हरी शंकर सिंग व रमाकांत साटम, कार्यकारी सदस्य म्हणून एकूण १७ व्यक्तीची निवड झाली असून त्यामध्ये दृष्टीबाधितासाठी कार्य करणाऱ्या ०८ व्यक्तींची निवड झाली आहे यामध्ये लातूर नॅबचे अध्यक्ष, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२चे माजी प्रांतपाल व यशस्वी उद्योजक डॉ.विजयभाऊ राठी यांची कार्यकारी सदस्यपदी भरघोस मताने निवड करण्यात आली आहे.
याच कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील डॉ.विजयभाऊ राठी आणि डॉ.गुणवंत बिरादार यांचा डॉ.नंदकूमार डोळे आणि रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनचे अध्यक्ष डॉ.संजय गवई यांनीही त्यांचा सत्कार केला
पुढे बोलताना डॉ.विजयभाऊ राठी म्हणाले की, दृष्टी बाधितांच्या क्षेत्रामध्ये मी मागील २० वर्षापासून सातत्याने कार्य करीत आहे लातूर जिल्ह्यासोबतच संपूर्ण मराठवाड्यामध्ये दृष्टीबाधितांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने माझा सहभाग राहिलेला आहे त्यामुळेच मला आता राष्ट्रीय पातळीवर दृष्टीबाधितासाठी कार्य करण्याची संधी प्राप्त झाली आहे त्या संधीचा उपयोग करून मी दृष्टीबाधितासाठी विविध प्रकारचे उपक्रम भविष्यामध्ये राबविणार आहोत असे ते म्हणाले .
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप सीए तेजमल यांनी केला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित मेहेत्रे यांनी केले तर आभार डॉ.ज्योती पाटील यांनी मानले .
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आशिष बाहेती, सुमतीलाल छाजेड, राजेश डुंगरवाल, शरद डुंगरवाल, राहुल बेलकुंदे, मुकुंद कुलकर्णी, सतीश मस्के यांच्यासह नॅब व मिरागी नेत्रालयातील डॉ.अनिल स्वामी, डॉ.समर्थ वाघाम्बंरे, राजेश लाठी, क्रांती पवार, महादेवी गडदे, गोदावरी नवले, शारदा, कावेरी, दिपा गवळी, स्वप्नील मानकोस्कर, अल्का आदुडे आदि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.