पोलीस दलात भरती होण्यास पूर्वी महिला उत्सुक नसत. अश्या काळात पोलीस दलात भरती होऊन उप अधीक्षक पदापर्यंत प्रवास करणाऱ्या सुनिता नाशिककर अनेक महिलांना पोलीस दलात भरती होण्यास प्रेरित करीत आहेत. आगामी काळात पोलीस दलासह समाजाच्या सर्वच क्षेत्रात महिलांचे प्रमाण लक्षणीय वाढेल व त्या अनेक क्षेत्रात समाजाला नेतृत्व प्रदान करतील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
राज्यपाल बैस यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस उप-अधिक्षक सुनिता नाशिककर यांनी लिहिलेल्या आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या ‘मी, पोलीस अधिकारी’ या पोलीस सेवेतील अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी ,दि. १६ मे रोजी राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
पोलीस दलात नोकरी करणे आव्हानात्मक आहे. विशेषतः महिलांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडून दिवसातील मोठा वेळ कर्तव्य बजावण्यासाठी द्यावा लागतो. सार्वजनिक उत्सव, निवडणुका, गणेश विसर्जन अश्या प्रसंगी कर्तव्याच्या ठिकाणी जास्त वेळ द्यावा लागतो. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात पोलिसांची संख्या कमी आहे. कामाच्या तणावामुळे आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात. परंतु आज परिस्थिती महिलांसाठी अधिक अनुकूल होत आहे असे सांगून आपल्या अनुभवांचे दस्तावेजीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी लेखिका सुनिता नाशिककर यांचे अभिनंदन केले.
प्रारंभी लेखिका सुनिता नाशिककर यांनी सर्वांचे स्वागत करून पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा विशद केली.पुस्तकाचे संपादन,प्रकाशन केल्याबद्दलप्रकाशिका सौ अलका भुजबळ आणि न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांचे आभार मानून त्यांची कन्या देवश्री च्या कोलंबिया विद्यापीठात होत असलेल्या पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी गेलेले असल्याने या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही,अशी माहिती दिली.
यावेळी आमदार संजय केळकर, लेखिका सुनिता नाशिककर यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
एका धाडसी महिलेचा प्रवास
महाराष्ट्र पोलीस दलात महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून थेट भरती झालेल्या,घरात उच्च शिक्षणाची,नोकरी करण्याची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या, एका गावातून आलेल्या पहिल्या बॅच च्या पोलीस अधिकारी तथा निवृत्त पोलीस उपअधीक्षक सुनिता नाशिककर यांनी लिहिलेल्या आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या “मी ,पोलीस अधिकारी” या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते राजभवनात संपन्न झाले.
ज्या काळात गावातील महिला नोकरीच करायच्या नाहीत तर शहरी महिला नर्स, शिक्षिका, कारकून अशा प्रकारच्या सुरक्षित नोकऱ्या करायच्या त्या काळात पोलीस दलात दाखल होण्याचे धाडस कसे केले,पुढे कठोर प्रशिक्षण आणि अत्यंत धडाडीने, प्रसंगी जीवावर उदार होऊन, प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना आलेले अनुभव या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.
यापूर्वी न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन ची सौ वर्षा महेंद्र भाबळ लिहित “जीवन प्रवास” आणि सौ रश्मी उल्हास हेडे लिखित “समाजभूषण २” ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
लेखन:देवेंद्र भुजबळ
☎️9869484800
सुंदर सुंदर सुपर डुपर