मुंबई -प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या आणि युवकांना प्रेरणादायी ठरणाऱ्या ३५ यश कथा असलेले “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक लिहिल्याबद्दल, पुस्तकाचे लेखक श्री देवेंद्र भुजबळ यांचा शाल, श्रीफळ देऊन मिशन आय ए एस चे विभागीय संचालक श्री रुपेश राठी यांनी नुकताच अकोला येथे सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे निवृत्त लेखापाल श्री प्रनील रोडे हे ही उपस्थित होते.
सत्कारानंतर श्री रुपेश राठी यांनी मिशन आय ए एस चे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली
मिशन च्या अकोला शाखेचे काम काज कसे सुरू आहे ,याची सविस्तर माहिती दिली.
तर श्री देवेंद्र भुजबळ यांनी पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा आणि पुस्तकातील नायक ,नायिका यांची माहिती दिली.
अल्प परिचय
शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी,त्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांचे ध्येय निश्चित करावे,त्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करावेत यासाठी मिशन आयएएस गेली २० वर्षे कार्यरत आहेत. विविध यशस्वी झालेल्या उमेदवारांची संवाद सत्रे आयोजित करणे,गावोगावी व्याख्याने देणे,उन्हाळी निवासी शिबिरे आयोजित करणे,पुस्तके प्रकाशित करणे असे विविध प्रकारचे उपक्रम मिशन आयएएस नियमितपणे आयोजित करीत असते.