28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*मिलेनियम टॉवर्स: "ई-वेस्ट" ला उस्फुर्त प्रतिसाद!*

*मिलेनियम टॉवर्स: “ई-वेस्ट” ला उस्फुर्त प्रतिसाद!*

नवी मुंबईतील सानपाडा येथील प्रसिध्द
“मिलेनियम टॉवर्स” या गुह संकुलात आयोजित करण्यात आलेल्या “ई-वेस्ट” ला रहिवाश्यांच्या उस्फुर्त प्रतिसाद लाभला
.

“ई-वेस्ट” म्हणजे आपल्याला नको असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू. बऱ्याचदा अशा वस्तू बिघडतात, दुरुस्तीच्या पलीकडे जातात किंवा नवीन मॉडेल्स आलेली असतात, कारणे काही का असेना,अशा वस्तू नकोशा वाटतात. त्यांचे करायचे तरी काय ? असा प्रश्न पडतो. विकायचं म्हटले तरी कुणी घेत नाही.अशा या वस्तू ग्रामीण भागात मात्र उपयोगी पडत असतात. म्हणून स्त्री मुक्ती संघटनेने अशा वस्तू गोळा करून,त्या चांगल्या असल्यास तशाच किंवा थोडी फार दुरस्ती करून उपयोगी पडत असल्यास दुरुस्ती करून किंवा तसे काही शक्य नसेल तर त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत दिवाळीच्या तोंडावर
नवी मुंबईतील सानपाडा येथील प्रसिध्द
“मिलेनियम टॉवर्स” या गुह संकुलात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या “ई-वेस्ट जमा” करण्याला रहिवाश्यांच्या उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

“मिलेनियम टॉवर्स” मधील ए विंग मध्ये १५० किलो तर बी विंग मध्ये ३५० किलो “ई – वेस्ट” जमा करण्यात आले.

या “ई – वेस्ट ” बरोबरच ए विंग मध्ये जमा करण्यात आलेल्या कपड्यांचे वजन ६०० किलो तर
बी विंग मध्ये जमा करण्यात आलेल्या कपड्यांचे वजन १०० किलो भरले.

स्त्री मुक्ती संघटना व नवी मुंबई महानगपालिकेच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमात
संघटनेच्या प्रमुख प्रा वृषाली मगदूम व महानगपालिकेचे
स्वच्छता अधिकारी श्री वडजे यांच्या देखरेखीखाली आशा गायकवाड आणि त्यांच्या सहकारी तसेच मिलेनियम टॉवर्स मधील रहिवासी सर्वश्री सलिम, श्रीकांत देशपांडे, चंद्रू,देवेंद्र भुजबळ, श्रीमती अंधारे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरीरीने सहभाग घेतला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]