देहदान करण्याची इच्छा.
मिरज: येथील रेल्वे स्टेशन जवळील विविध शस्त्रक्रियांसाठी व स्वयम् संशोधित मुळव्याधीवरील उपचारासाठी ५९ वर्षे प्रसिद्ध असलेल्या श्री हॉस्पिटलचे प्रमुख ८९वर्षीय मिरज भूषण डॉ. बिंदुमाधव दत्तात्रेय पुजारी यांचे पाच जुलै २०२३ रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची देहदान करण्याची इच्छा होती.
मिरजेतील डॉक्टर बिंदुमाधव पुजारी हे केवळ राष्ट्रीय स्तरावरील नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम शल्यविशारद व जनरल सर्जन म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक रोगावर उत्कृष्ट पणे शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. भारतातील विविध राज्यातील असंख्य रुग्ण त्यांच्याकडे उपचाराला येत असतात.
२४एप्रिल १९३५ रोजी नरसोबावाडी येथे त्यांचा जन्म झाला. श्री दत्त विद्या मंदिर येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले व कुरुंदवाड येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल मध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. इंटरसायन्स ला ते पुणे विद्यापीठामध्ये पहिले आले होते.
पुणे विद्यापीठातून एम बी बी एस झाल्यानंतर जनरल सर्जरी मध्ये एम एस केले . जन्मभूमीची सेवा करण्यासाठी त्यांनी मिरजेत स्थायिक होण्याचे ठरविले .
डेक्कन सर्जिकल सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून तसेच महासचिव म्हणून त्यांनी पंचवीस वर्षे काम केले .महाराष्ट्र चाप्टर ऑफ असोसिएशन ऑफ सर्जन्स या संघटनेचे ते बारा वर्षे राज्य सचिव होते. १९९५ साली त्यांना असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला.
आत्तापर्यंत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये चाळीस आर्टिकल्स प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्सेस मध्ये त्यांनी शंभरपेक्षा जादा पेपर्स सादर केले आहेत . तीन पाठ्यपुस्तका सह इतर पुस्तकातून त्यांची दहा प्रकरणे प्रसिद्ध आहेत .इंटेस्टीनल ट्यूबर्क्युलोसिस ची सुधारित शस्त्रक्रियेची पद्धती ही त्यांची देण आहे. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स, एडिनबर्ग ची फेलोशिप त्यांना मिळालेली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडी चे ते सदस्य होते.
रोटरी क्लब, रेड क्रॉस सोसायटी, इंडियन कॅन्सर सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलेले आहे.
असोसिएशन्स ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया ही १९३८ मध्ये स्थापन झालेली संघटना असून सुरुवातीस केवळ ११२ सदस्य होते . सध्या २८हजार सर्जन्स सदस्य आहेत . या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेचे डॉ. बी. डी. पुजारी राष्ट्रीय अध्यक्ष होते.