देशाचे नाव उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा
– पोलीस अधिक्षक सोमय मुंडे
श्री. मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा 83 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
लातूर, प्रतिनिधी
देशाच्या विकासासाठी गुणवत्ताप्रप्त विद्यार्थ्यांची गरज असून विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून गुणवत्ता प्राप्त करून आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी केले.
श्री. मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा 83 व्या वर्धापन दिन सोहळा शनिवारी राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला, याप्रसंगी ते बोलत होते. श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मिरमण लाहोटी, संस्था अध्यक्ष शैलेश लाहोटी, सचिव ॲड आशिष बाजपाई, सहउपाध्यक्ष दिनेश इन्नानी, सहसचिव शरदकुमार नावंदर, उप सहसचिव लक्ष्मीकांत करवा, कोषाध्यक्ष ईश्वरप्रसाद डागा, कमलकिशोर अग्रवाल, बालकिशन बांगड, संजय बियाणी, श्यामसुंदर खटोड, सुहास शेट्टी, किशोर भराडीया, आशिष अग्रवाल, चैतन्य भार्गव, निखिल राठी रवींद्र व्होरा, संजय भराडिया, आनंद लाहोटी, सौ. वंदना इन्नानी, डॉ. अनिल राठी, हुकुमचंद कलंत्री, शांतीलाल कुचेरिया, सूर्यप्रकाश धुत, संस्थांतर्गत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांनी शहीद जवानांच्या स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. संस्थेच्या सर्व शाळांतील विद्यार्थीनी अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने परेड पथसंचलनाचे सादरीकरण केले, याची पाहणी करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
परेड पथसंचलनामधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, टीम वर्क, नेतृत्वगुण या सर्वात महत्वाच्या गुणवत्ता निर्माण होतात आणि या लहानपणीच माझ्या मध्ये निर्माण झाल्याने याचा फायदा मला माझ्या करिअर मध्ये झाला असल्याचे सांगून सोमय मुंडे म्हणाले की, स्व. सेठ पुरणमल लाहोटी यांनी पहिल्यांदा राजस्थान शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ लातूर मध्ये रोऊन शिक्षणाची सुरुवात केली आणि याचा फायदा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना झाला. म्हणून विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी लागणारे सक्षम नागरिक बनावे.
श्री. मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी आपल्या भाषणात म्हणाले की, राजस्थान शिक्षण संस्था ही मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे प्रमुख केंद्र होती. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शिक्षण संस्थेतून असंख्य गुणवान विद्यार्थी घडत असून राष्ट्र उभारणीसाठी सक्षम व उत्तम विद्यार्थी आजपर्यंत संस्थाअंतर्गत शाळांमधून घडविले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव ॲड. आशिष बाजपाई यांनी केले. 1940 मध्ये स्व. सेठ पुरणमल लाहोटी यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन संस्थेचे रोप लावले याचे आज वटवृक्ष नाही तर कल्पवृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे. आधुनिक काळात शैक्षणिक गुणवत्तेसोबत शारीरिक व संगणकीय गुणवत्ता हा त्रिवेणी संगम महत्त्वाचा असून, विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी संस्था नेहमी प्रयत्न करते. संस्थेचा विविध शाळांमधून जिल्हा विभागीय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यापुढे शिक्षकांनी अभ्यासपूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन ॲड. आशिष बाजपाई यांनी केले. दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी श्री मारवाडी राजस्थान विद्यालयास सरस्वती मातेची मूर्ती भेट दिल्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सहकुटुंब विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. योगिनी घुगे तर आभाप्रदर्शन लक्ष्मीकांत करवा यांनी केले.
आदर्श शिक्षक, कर्मचारी व उत्कृष्ठ खेळाडू पुरस्कार
संस्थेच्यावतीने संस्था अंतर्गत विविध शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांनासह खेळाडूंना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते पुढीलप्रमाणे सन्मानीत करण्यात आले. राजस्थान विद्यालाचे शिक्षक अनिल तापडिया- भास्करराव शंकरराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार (रोख 5000, ट्रॉफी, सन्मानचिन्ह), श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे शिक्षक शेखर मांडे- आदर्श शिक्षक पुरस्कार (रोख 5000, ट्रॉफी, संमनचिन्ह), गोदावरीदेवी लाहोटी विद्यालयाच्या योगिनी सहस्रबुद्धे यांना रामनाथजी भराडिया आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (रोख 5000, ट्रॉफी, सन्मानचिन्ह) तर रुद्राणी पाचंगे, समीक्षा मंदे, श्रिया सोनी, जिया भानुशाली, रुद्र पाटील या खेळाडूंना अजय भारत बाजपाई उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
——————————————————————-
सेवा निवृतांचा सत्कार
चेतना शहा, सूनित्रा हूच्चे, शारदा ठाकूर, वर्षा ठाकूर या संस्थांतर्गत विविध शाळांमधून सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार याप्रसंगी संस्थेच्या वतीने करण्यात आला.
छायाचित्र- श्याम भट्टड