24 C
Pune
Saturday, May 10, 2025
Homeठळक बातम्या*मानवतेच्या देशरुपी मंदिराला राष्ट्रभक्तीचे दरवाजे असलेच पाहिजेत! - योगेश्वर कस्तुरे*

*मानवतेच्या देशरुपी मंदिराला राष्ट्रभक्तीचे दरवाजे असलेच पाहिजेत! – योगेश्वर कस्तुरे*

 परभणी- *स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, परभणी* यांच्या वतीने *स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर* यांच्या कार्याचा, विचारांचा सर्वत्र प्रसार व्हावा या उद्देशाने दि. १३ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ५.०० वाजता वैष्णवी मंगल कार्यालय, विद्यानगर, परभणी* येथे *कै. विठ्ठलराव धानोरकर  स्मृती व्याख्यानमालेतील १६वे वार्षिक सावरकर व्याख्यान पुष्प* गुंफल्या गेले. याप्रसंगी सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद या विषयांचे अभ्यासक; "डॉ आंबेडकर आणि इस्लाम" या इंग्रजी पुस्तकासह अनेक पुस्तकांचे लेखक व धर्मजागरण विभागाच्या डेमोस फाउंडेशन पुणे या आंतरधर्मीय अध्ययन केंद्राचे पूर्व सहप्रमुख, फाळणीच्या वेदना या सांस्कृतिक वार्तापत्राचे विशेष अतिथी संपादक आणि *प्रसिद्ध वक्ते श्री योगेश्वर कस्तुरे, पुणे यांचे "भारतापुढील आव्हाने आणि कालसुसंगत सावरकर" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  परभणी येथील प्रख्यात हृदयरोग तज्ञ *डॉ श्रीपाद धानोरकर हे अध्यक्षस्थानी* होते. याप्रसंगी *भारतमाता, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कै. विठ्ठलराव धानोरकर* यांच्या चित्र प्रतिमांचे पूजन करण्यात आले. स्वागताच्या औपचारिक कार्यक्रमानंतर श्री गोविंदस्वामी आफळेरचित सावरकर गाथेतील "मी माळ गुंफिली अवघ्या सात फुलांची" हे गीत  वीणा मांडाखळीकर यांनी आपल्या भावपूर्ण आवाजात गायले.

   विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री आणि अयोध्येतील राम मंदिर बांधण्यात महत्वाची भूमिका बजावणारे आदरणीय *श्री दादा वेदक* आणि या कार्यक्रमासाठी प्रकृती साथ देत नसतानाही मुद्दाम पुण्याहून या कार्यक्रमाला आशिर्वाद देण्यासाठी मंडळाचे पूर्व कार्याध्यक्ष *श्री राजेश्वर राव पारवेकर* आवर्जून उपस्थित राहिले. *श्री दादा वेदक* यांचा सत्कार *डॉ धानोरकर* यांनी केला.

   मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांनी प्रास्ताविकात संस्थापक श्री राजेश्वरराव पारवेकर यांनी हे मंडळ ४० वर्षे चालवताना घेतलेल्या परिश्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. समाजातील नकारात्मकता कमी करण्याबरोबरच राष्ट्रीयत्वाची भावना वाढविणे आणि शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन गेमिंगपासून परावृत्त करत नवीन पिढीला राष्ट्रभक्तीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न करणे हे मंडळापुढे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

     प्रास्ताविकानंतर *प्रमुख वक्ते श्री योगेश्वर कस्तुरे* यांचा  सत्कार मंडळाचे ज्येष्ठ सदस्य *श्री भास्करराव कुंडीकर* यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे *अध्यक्ष डॉ श्रीपाद धानोरकर* यांचा सत्कार *डॉ मांडाखळीकर* यांच्या हस्ते करण्यात आला. एक विशेष बाब म्हणून वैष्णवी मंगल कार्यालयाचे *श्री विजयराव उर्फ बंडूनाना सराफ* यांचा सत्कार *मंडळाचे अध्यक्ष डॉ धानोरकर* यांनी केला. *श्री योगेश्वर कस्तुरे* यांचा परिचय *श्रीकृष्ण उमरीकर* यांनी तर *डॉ धानोरकर* यांचा परिचय *सौ शरयुताई अंबेकर* यांनी करून दिला. 

 *श्री कस्तुरे* यांनी आपल्या व्याख्यानात  हिंदुंच्या मनातील भ्रांतीचे तत्वज्ञान, सद् गुण विकृति यामुळे झालेले समाजाचे नुकसान यावर दीर्घ विवेचन केले. शक्तीपूजा आणि राष्ट्रभक्ती हे केंद्रस्थानी ठेवून  मानवतेच्या मंदिराला राष्ट्रभक्तीचे दरवाजे असलेच पाहिजेत असे स्पष्ट करत भारतीय संस्कृतीचे महत्व त्यांनी विषद केले. सावरकरांना दृष्टा पुरुष का म्हणतात यावरही कस्तुरे सविस्तरपणे चर्चा केली.

    *डॉ श्रीपाद धानोरकर* यांनी अतिशय थोडक्यात केलेल्या अध्यक्षीय भाषणात *वडील कै. विठ्ठलराव धानोरकर* यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या स्वा. सावरकर व्याख्यानमालेचे हे १६वे वार्षिक पुष्प आहे याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कुंडीकर आणि धानोरकर परिवाराचे या राष्ट्रीय कार्यातील योगदान याबद्दलही ते बोलले.

    *श्री अर्जुन श्रीकृष्ण उमरीकर* यांनी आभार प्रदर्शन करतांना वैष्णवी मंगल कार्यालय उपलब्धतेसाठी श्री बंडुनाना आणि अभिजीत सराफ यांच्यासह अनेकांचे आभार मानले. आभार प्रदर्शनानंतर शेवटी बालकलाकार *कु वैभवी बोबडे* या छोट्या मुलीने *संपूर्ण वंदे मातरम्* गाऊन कार्यक्रमाचा समारोप केला. *सौ तनुजा कापरे* यांनी कार्यक्रमाचे उत्तम संचलन केले. 

 कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीकृष्ण उमरीकर, विजयराव वैद्य, प्रवीण सराफ, आचार्य अविनाश गोहाड,  प्रीतीताई वैद्य, सौ वृषालीताई विश्रुप, सुचेताताई व सौ माधुरीताई काशीकर, रामभाऊ लोकडे, वीणा मांडाखळीकर,  कु. निशा पावडे, कु. उत्कर्षा आणि कु. कीर्ती शिंदे कु. गौरी आणि कु. वैभवी बोबडे, कु. आर्या आणि कु. रेवा विश्रुप, चि. युवराज गरुड आणि असंख्य कार्यकर्ते झटत होते. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात असंख्य श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]