25.5 C
Pune
Sunday, January 12, 2025
Homeठळक बातम्या*माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची विधानसभेत मागणी*

*माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची विधानसभेत मागणी*

लंपी आजारामुळे पशुधन  दगवलेल्या सर्व शेतकऱयांना अधिवेशन संपण्यापूर्वी शासनाने मदत द्यावी

पिक विम्याच्या धर्तीवर पशुधनाचा सरसकट विमा उतरवण्याची योजना शासनाने राबवावी

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची विधानसभेत मागणी

मुंबई (प्रतिनिधी) 

लंपी आजारामुळे पशुधन दगावलेल्या सर्व शेतकऱ्यांना शासनाने विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी  मदत द्यावी, त्याचबरोबर पिक विम्याच्या धर्तीवर  पशुधनाचा सरसगट विमा उतरविण्याची योजना राबविण्यात यावी अशी मागणी  आज माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत केली. 

मागच्या वर्षभरात लंपी रोगामुळे महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात पशुधनाची हानी झाली आहे. या संदर्भाने सध्या सुरु असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लाक्षवेधी मांडली होती. या संदर्भाने शासनाच्या वतीने दिलेल्या उत्तराने आमचे समाधान झाले नसल्याचे सांगत  विधानसभेत लंपी रोगामुळे राज्यात पशुधन दगावलेल्या सर्व शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत देण्याची मागणी त्यांनी  केली. 

लंपी रोगामुळे लातूर जिल्ह्यात ६४४ जनावरांचा मृतू झाला आहे. शासनाकडून अद्याप सर्वांना मदत मिळालेली नाही. अजूनही २७७ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत हे अधिवेशन संपण्यापूर्वी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली .

लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्यात लसीकरणाचे काम सुरु आहे का? असेल तर लसीकरण किती प्रमाणात झाले आहे? आणि कोणती लास देण्यात येत आहे? याची माहिती देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. 

सरसगट पशुधन विमा योजना राबवावी

शासनाच्या काही योजनांमध्ये पशुधनाचा विमा उतरविण्यात येतो परंतु लंपी सारख्या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता  पिकविम्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या सर्व पशुधनाचा सरसगट उतरविण्याची योजना शासनाने राबवावी  अशी मागणीही आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी केली. 

अधिवेशन संपण्यापूर्वी सर्वांना मदत

दरम्यान लंपी आजारामुळे पशुधन दगावलेल्या सर्व शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदतीचे वाटप पूर्ण केले जाईल अशी घोषणा राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चेदरम्यान केली. लंपी प्रादुर्भावामुळे दगावलेले पशुधन, शेतकऱ्यांना मदतीचे वाटप या संदर्भाने आकडेवारी सादर करून दुसऱ्या टप्प्यात आता प्रादुर्भाव नसलेल्या भागातही जनावराच्या लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले . पिकविम्याच्या धर्तीवर पशुधनाचा सरसगट विमा उतरविन्याबाबत शासन निश्चित विचार करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]