38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeसामाजिक*माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकरांकडुन खुमसे व गोमारे परिवाराचे सांत्‍वन*

*माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकरांकडुन खुमसे व गोमारे परिवाराचे सांत्‍वन*

लातूर (प्रतिनिधी):-जेष्‍ठ स्‍वातंत्रसेनानी मुर्गप्‍पा खुमसे व जेष्‍ठ नेते अॅड.मनोहरराव गोमारे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालेले आहे. माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी खुमसे व गोमारे यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन कुटुबियांची भेट घेवून सात्‍वंन केले यावेळी माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी शोक व्‍यक्‍त करत त्‍यांच्‍या प्रतिमेस आदराजंली वाहिली.

मराठवाडा मुक्‍तीसंग्रामात आपले अमुल्‍य योगदान देणारे मुर्गप्‍पा खुमसे यांचे काही दिवसापूर्वी वृध्‍दकाळाने निधन झाले. स्‍वामी रामानंद तीर्थ यांच्‍यासह अनेक जेष्‍ठ स्‍वातंत्र्यसैनिका सोबत खांदयालाखांदा लावून मुक्‍तीसंग्रामात लढा देणारे मुर्गप्‍पा खुमसे यांनी कारावासही भोगला होता. जेष्‍ठ स्‍वातंत्रसेनानी म्‍हणुन ओळख असलेले मुर्गप्‍पा खुमसे यांच्‍या निधनाने केवळ रेणापूर तालुक्‍याच नव्‍हे तर संपूर्ण लातूर जिल्‍हयात हळहळ व्‍यक्‍त करण्‍यात येत होती. माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेणापूर येथे खुमसे यांच्‍या निवासस्‍थानी जावून जेष्‍ठ स्‍वातंत्रसेनानी मुर्गप्‍पा खुमसे यांना आदराजंली वाहिली. तसेच यावेळी खुमसे परिवाराचे सात्‍वंन करून त्‍यांच्‍या दु:खात सहभागी होत आगामी काळात खुमसे परिवाराच्‍या अडचणीला कायमसोबत राहु अशी ग्‍वाही दिली.

यावेळी खुमसे यांचे चिरंजीव शिवराज खुमसे, नातू रोहित, रितेश भाजपाचे जिल्‍हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, निलंगा विधानसभा प्रभारी दगडु सोळुंके, जिल्‍हा उपाध्‍यक्ष शेषेराव ममाळे, माजी जि.प.सदस्‍य संतोष वाघमारे, प्रदीप मिरजकर, चंद्रकांत कातळे, सुधीर तोडकरी, अच्युत कातळे, संतोष राठोड, शेख अजिम, राजकुमार आलापुरे, मारुफ आत्तार यांच्यासह रेनापुर शहरातील भाजपचे पदाधिकारी व इतर अनेक जण होते.

लातूरच्‍या विधी, सामाजिक, शैक्षणीक व राजकीय क्षेत्रात आपल्‍या कर्तृत्‍वाने ठसा उमटवणारे अॅड.मनोहरराव गोमारे यांचेही काही दिवसापूर्वी निधन झालेले आहे. लातूर येथील निवासस्‍थानी जावून माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्‍यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पाजंली अर्पण केली. तसेच यावेळी गोमारे परिवाराचे सात्‍वंन करून त्‍यांच्‍या आठवणीना उजाळा दिला. अॅड.मनोहरराव गोमारे यांनी लातूर आणि लातूरकरांच्‍या हितासाठी केलेली आंदोलने ही नेहमीच आम्‍हाला प्रेरणा देणारी रा‍हतील असे सांगून अॅड.गोमारे यांचे कार्य सर्वांसाठीच आदर्शदायी असल्‍याचे सांगितले. यावेळी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष दिलीपराव देशमुख, निलंगा विधानसभा प्रभारी दगडु सोळुंक, जिल्‍हा उपाध्‍यक्ष शेषेराव ममाळे, मनपाचे माजी गटनेते अॅड.शैलेश गोजमगुंडे, माजी स्‍थायी समिती सभापती अॅड.दिपक मठपती, माजी नगरसेवक सुनिल मलवाड, माजी नगरसेवक संगीत रंदाळे आदीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]