लातूर( प्रतिनिधी ):- लातूरचे माजी नगराध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष एस.आर.देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यामुळे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी देशमुख परिवाराची भेट घेवून त्यांचे सात्वंन केले.
निलंगा तालुक्यातील लांबोटा येथील रहिवासी असणारे मात्र लातूरात स्थायिक झालेले एस.आर.देशमुख यांचे लातूर शहराच्या समाजकारणात व राजकारणात मोठे योगदान होते. काही दिवसापूर्वीच एस.आर.देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. एस.आर.देशमुख यांनी लातूरच्या नगराध्यक्ष पदासह लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष म्हणुनही जबाबादारी सांभाळलेली होती.
काही दिवसापूर्वीची एस.आर.देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज देशमुख यांच्या निवासस्थानी जावून स्व.एस.आर.देशमुख आदराजंली वाहुन देशमुख कुटुंबियांचे सात्वंन केले. यावेळी देशमुख परिवारातील सदस्यांसह भाजप पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकराकडुन देशमुख परिवाराचे सात्वंन
लातूर :- लातूरचे माजी नगराध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष एस.आर.देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यामुळे भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी देशमुख परिवाराची भेट घेवून त्यांचे सात्वंन केले.
निलंगा तालुक्यातील लांबोटा येथील रहिवासी असणारे मात्र लातूरात स्थायिक झालेले एस.आर.देशमुख यांचे लातूर शहराच्या समाजकारणात व राजकारणात मोठे योगदान होते. काही दिवसापूर्वीच एस.आर.देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. एस.आर.देशमुख यांनी लातूरच्या नगराध्यक्ष पदासह लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष म्हणुनही जबाबादारी सांभाळलेली होती. त्याच बरोबर समाजकारणातही अनेक वेगवेगळे उपक्रम राबवून आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेले होते. त्यांच्या निधनाने लातूर शहराच्या राजकारणात व समाकारणाचे मोठे नुकसान झाले आहे.
या निधनाबद्दल भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या एस.आर.देशमुख प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रध्दाजंली वाहली. त्याचबरोबर देशमुख परिवारांचेही सात्वंन केले. यावेळी पी.आर.देशमुख, गणेश देशमुख, अभिजीत देशमुख यांची उपस्थिती होती.