39.4 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडीमाघवारीचे आज प्रस्थान

माघवारीचे आज प्रस्थान

अडीचशे वर्षाच्या परंपरेची माघवारी
………………………………………
सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज यांच्या पालखीचे पायी दिंडीसह
गुरुवारी 30 जानेवारीला प्रस्थान

…………………………………….
श्री सच्चितानंद सद्गुरु श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसा यांच्या पावनपरंपरेची माघ पायी वारी दिंडी पालखी सोहळा हजारो शिष्य वारकऱ्यांच्या सहभागासह ज्ञानोबा तुकोबा, विठ्ठल व सद्गुरु नामाचा जयघोष करीत गुरुवार दिनांक 30 जानेवारी २५ रोजी सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र गोपाळपूर औसा येथून निघून नाथ मंदिर गांधी चौक जुन्या बोरफळ रस्त्याने पादुका मंदिर मार्गे बोरफळ गावी पहिल्या दिवशी मुक्कामाला प्रस्थान ठेवेल.

नाथ संस्थानचे पाचवे पिठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नियोजन मार्गदर्शनात माग पायी वारी दिंडी सोहळा विठू नामाच्या गजरात रवाना होईल पहिला मुक्काम बोरफळ असून 31 जानेवारी दुपार विश्रांती बेलकुंड तर रात्र मुक्काम उजनी येथे ज्ञानेश्वर मंदिर येथे राहील.
एक फेब्रुवारी रोजी उजनी हून पालखीचे पहाटे प्रस्थान होईल
पालखी धूत्ता पाटी मार्गे नांदुर्गी येथे न्याहारीसाठी थांबेल व दुपार विश्रांती उंबरे गव्हाण येथे करून रात्र मुक्कामासाठी केशेगाव तालुका धाराशिव येथे पालखीचे आगमन होईल.


2 फेब्रुवारी रोजी धारूर दुपार विश्रांती घेऊन दिंडी आई तुळजाभवानी मंदिरात दुपारी दोन वाजता पोहोचेल तेथे आई जगदंबेचा अभंग सेवा व दर्शन आटोपून घाटशिळ मार्गे रात्र मुक्कामासाठी पालखी दिंडी आळजापूरला थांबेल
दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आळजापूर मिर्झापूर मार्गे कासारी दुपारी विश्रांती करिता व नंतर काटी गावाहून दिंडी रात्र मुक्कामासाठी शेळगाव ला पोहोचेल.
4 फेब्रुवारी रोजी पहाटे शेळगावहून कळमन मार्गे मसले चौधरीला दुपार विश्रांतीसाठी थांबून नंतर नरखेड येथे रात्रीचा मुक्काम पालखीचा असेल.


5 फेब्रुवारी रोजी दुपार विश्रांती मलिकपेठ तर रात्र मुक्कामासाठी तात्याबाचे चारोळी या गावी पालखी दिंडीचा मुक्काम राहील.
6 फेब्रुवारी रोजी दुपार विश्रांती तुंगत तर रात्र मुक्कामासाठी पालखी दिंडी हजारो भाविकांच्या सह चंद्रभागेच्या येलं तीरी थांबेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी हजारो वारकरी टाळकरी विणेकरी व भक्तांच्या सहभागात विठ्ठल नामाच्या नामघोषात पैलतीरी चंद्रभागेच्या वाळवंटात औसेकर महाराजांच्या फडावर पोहोचेल. तिथे पालखीचे जंगी स्वागत वाळवंटातील खेळ खेळीया आरती होऊन पुढे सलग चार दिवस वाळवंटी नामसंकीर्तनाचा जल्लोष चालेल.


दशमी एकादशी द्वादशी सलग तीन दिवस हरिकीर्तनात सात फेब्रुवारीला सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे तर 8 फेब्रुवारी माघ एकादशी दिनी गुरुवर्य श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होईल द्वादशी दिनी सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांची कीर्तन सेवा आणि खिरापत सोहळा होईल.
त्रयोदशी दिनी
श्री विठ्ठल मंदिरात
श्री गुरुबाबा महाराज
यांचे प्रासादिक चक्रीभजन
……

……………………….,
मग शुद्धतृयोदशी सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी पूर्वपरंपरेप्रमाणे
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रासादात सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचे प्रासादिक चक्रीभजनाची सेवा विठ्ठल रुक्मिणी समोर दुपारी तीन ते पाच या दरम्यान रुजू होईल कोणतेही शासन प्रशासन असेल पण अनंत काळापासून औसेकर महाराजांना प्रासादिक चक्रीभजन विठ्ठल मंदिरात करण्याचा मान आहे ही औसेकर गुरु गादीच्या शिष्यांसाठी गौरवास्पद आहे.
दिनांक 11 फेब्रुवारी पहाटेच सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान ची पालखी मोजक्या वारकऱ्यासह परतीच्या प्रवासासाठी औशाकडे परतते व दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सद्गुरु दास वीरनाथ महाराज यांच्या उत्सवाची स्थापना व गोपाळकाला होऊन याच दिवशी दुपारी एक वाजता दहीहंडी काला माघ वारी सोहळ्याची सांगता होते.


या मागवारी सर्व वारकरी सदभक्तांनी मोठ्या संख्येने श्रद्धेने नामसंकीर्तन पायी पंढरी वारी करण्याचे पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी यावे पंढरीनाथ तुम्हाला ही वारी घडवतील असे आवाहन
ह भ प श्री श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर व ह भ प श्री ज्ञानराज महाराज औसेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]