विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचा ३८ वा गळीत हंगाम व सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ
लातूर ;( माध्यम वृत्तसेवा)-:– विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा २०२४-२५ मधील गळीत हंगाम व नव्याने उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा चेअरमन सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
तसेच सदर प्रसंगी कारखाना मालकीच्या दोन हार्वेस्टर चे (ऊस तोडणी यंत्राचे) पूजन करण्यात आले, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याने मागील गाळप हंगामामध्ये सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संकल्पनेने जवळपास 97 टक्के ऊसतोड हार्वेस्टर द्वारे करून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये हार्वेस्टर द्वारे ऊस तोडणी करण्याचा मांजरा पॅटर्न निर्माण केला आहे. त्याबाबत देशभरामध्ये सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी निर्माण केलेल्या या मांजरा पॅटर्नचे कौतुक होत आहे. कारखान्याकडे या अगोदर पाच हार्वेस्टर आहेत त्यामध्ये आणखीन दोन हार्वेस्टरची भर पडली आहे.
तत्पूर्वी कारखान्याचे संचालक श्री कैलास पाटील यांनी सपत्नीक श्री मांजरेश्वर हनुमान अभिषेक , गव्हाण पूजन व सत्यनारायण पूजन केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे,जागृती शुगरचे व्हा. चेअरमन लक्ष्मणराव मोरे, संत शिरोमणी चे चेअरमन शाम भोसले,व्हा.चेअरमन सचिन पाटील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ, मांजरा परिवारातील कारखान्यांचे कार्यकारी संचालक आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, मांजरा परिवाराने काळाची गरज ओळखून नेहमीच विविध प्रकल्प कार्यान्वित करून शेतकऱ्यांना हेवा वाटेल असे कार्य केले आहे. सहकार क्षेत्राचे पवित्र जपत असताना शेतकरी सभासदांचा कारखान्यांवर असलेला विश्वास कायम ठेवण्याचे काम आजपर्यंत केले व यापुढे देखील केले जाईल असे सांगून गळीत हंगाम २०२४-२५ साठी सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
योग्य नियोजनातून यशस्वी वाटचाल- आमदार धिरज विलासराव देशमुख