विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना…
२४ ऑक्टोबर विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर बाॅयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
लातूर :– ऊस उत्पादक शेतक-यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या ऊसाचे गाळप तत्परतेने व वेळेत व्हावे या उद्देशाने गळीत हंगाम २०२३-२०२४ मधील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा बाॅयलर अग्नी प्रदीपन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून ३७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ, विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दि.२४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ठीक ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कारखान्याचे चेअरमन तथा मांजरा परिवारातील साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते बाॅयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ पार पडणार आहे.
गळीत हंगाम २०२३-२०२४ साठी आवश्यक असणारी सर्व तयारी चेअरमन मा.श्री. सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री मा. श्रीआ.अमित विलासरावजी देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार मा.श्री.धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने पुर्ण केली असून परंपरेनुसार हा हंगाम देखील यशस्वी होईल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.

२४ ऑक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या बाॅयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास शेतकरी, सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, सर्व संचालक व कार्यकारी संचालक पंडित देसाई यांनी केले आहे.