दिलेला भाव एफआरपी नुसार नसेल तर पुन्हा आंदोलन – आ. रमेशअप्पा कराड
लातूर दि.१७ – गाळप केलेल्या ऊसाला शासनाच्या नियमानुसार एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना भाव द्यावा यासाठी मागील वर्षी भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी केलेल्या आंदोलनाचा धसका घेवून यावर्षी मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिल्यांदाच एफआरपी नुसार अंतिम भाव देत आहेत असे घोषित केले. खऱ्या अर्थाने केलेल्या आंदोलनाचे हे यश असल्याने शेतकऱ्यांच्या वतीने रविवारी आ. रमेशअप्पा कराड यांचा सत्कार करून समाधान व्यक्त केले.
गाळप केलेल्या ऊसाला एफआरपी प्रमाणे भाव देण्याबाबत शासनाचे बंधन असून वेळोवेळी सर्व संबंधिताकडे मागणी करूनही शेतकऱ्यांना कष्टाचा मोबदला मिळाला नसल्याने शासनाच्या नियमानुसार गाळप केलेल्या ऊसाला एफआरपी प्रमाणे भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी दिनांक ९ ऑगस्ट २०२१ क्रांतीदिनी आणि १२ नोव्हेंबर २०२१ रोजी मांजरा कारखान्याच्या गेट समोर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली मांजरा कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनात मांजरा परिवारातील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येनी सहभागी झाले होते. मांजरा परिवारातील मांजरा, विलास, विलास -२ आणि रेणा साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस दिलेले सर्वजण कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आहेत. एफआरपीप्रमाणे त्यांना भाव मिळाला पाहिजे हा त्यांचा हक्क आहे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा आणि घामाचा मोबदला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहील असा इशारा या आंदोलनातून आ. कराड यांनी दिला होता. सदरील आंदोलन होताच त्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिलाचा हप्ता जमा करण्यात आला होता.
मागच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने ऊसाची लागवड मोठया प्रमाणात झाली होती. त्याचबरोबर ऊसाची उत्पादकताही वाढली होती. मात्र दुर्दैवाने मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाची तोडणी करण्याऐवजी कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळपास आणून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी हेळसांड केली. आपला ऊस जावा यासाठी प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना तोडणी वाहतूक यंत्रणेसाठी एकरी हजारो रूपये मोजावे लागले होते.
गाळप केलेल्या ऊसाला शासनाच्या नियमानुसार एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना भाव द्यावा यासाठी मागील वर्षी भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी केलेल्या आंदोलनाचा धसका घेवून यावर्षी मांजरा परिवारातील मांजरा, विलास आणि रेणा साखर या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिल्यांदाच एफआरपी नुसार अंतीम भाव देत असल्याचे घोषीत करून अंतिम ऊस बिलाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. खऱ्या अर्थाने एफआरपी साठी मांजरा कारखान्याच्या दारात केलेल्या आंदोलनामुळे हे यश आले असल्याने शेतकऱ्यांच्या वतीने रविवारी आ. रमेशअप्पा कराड यांचा सत्कार करून समाधान व्यक्त केले.
मांजरा परिवारातील साखर कारखाने देत असलेला अंतिम भाव शासनाच्या नियमानुसार एफआरपी प्रमाणे आहे किंवा नाही याबाबतची माहिती घेऊन जर दिलेला भाव एफआरपी प्रमाणे नसेल तर शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे ऊसाचे बिल मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचे आ. रमेशअप्पा कराड यांनी याप्रसंगी सांगितले तर भविष्यात शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आ. रमेशअप्पा कराड यांच्या संघर्षाला खंबीरपणे आम्ही साथ देवू असे यावेळी अनेकांनी बोलून दाखविले.
याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, रामचंद्र तिरूके, अशोक केंद्रे, विक्रम शिंदे, संतोष मुक्ता, रेखाताई तरडे, साहेबराव मुळे, हणमंतबापू नागटिळक, वसंतराव डिघोळे, गोविंद नरहरे, भागवत सोट, रोहीदास वाघमारे, शंकर रोडगे, शामल कारामुंगे, उत्तरा कलबुर्गे, ललिता कांबळे, सुरेखा पुरी, डॉ. बाबासाहेब घुले, अभिषेक आकनगिरे, दशरथ सरवदे, बन्सी भिसे, हणमंत देवकत्ते, शिवाजी बैनगीरे, राजकिरण साठे, बस्वराज रोडगे, पंडीत सुकणीकर, पंडीत सुर्यवंशी, महेश पाटील, मनोज पुदाले, बालाजी गवारे, धर्मपाल देवशेट्टे, सुभाष जाधव, ज्ञानेश्वर वाकडे, काकासाहेब मोरे, हरीभाऊ काळे, भिमाशंकर राचट्टे, सुनिल उटगे, रामेश्वर पाटील, निळकंठ पाटील, नागनाथ माने यांच्यासह अनेकजण होते.