लातूर सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम,मिरवणूक, रक्तदान शिबिर , महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून; सर्व पंथीय जैन बंधू-भगिनींनी या महोत्सवात सहभागी व्हावे ,असे आवाहन स्वागताध्यक्ष राजीव बुबणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे .
भगवान महावीर 2611 जनकल्याण महोत्सव समितीच्या वतीने आयोजित जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी ९ वाजता सुमतीलाल छाजेड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे . यानिमित्त मुख्य समारोहाचे आयोजन करण्यात आले असून तपमहर्षी खान्देश शिरोमणी उपप्रवर्तक अक्षय ऋषीजी म.सा. परमपूजनीय गीतार्थ ऋषीजी म .सा . यांच्या उपस्थितीत व उद्योगपती सुमतिलाल छाजेड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मुख्य समारोह कार्यक्रमात इतिहास संशोधक डॉ. सोमनाथ रोडे ‘भगवान महावीर के सिद्धांत’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत . यावेळी समाजभूषण सुमतीलाल छाजेड, स्वागताध्यक्ष राजीव बुबणे, आयएएस अधिकारी कमलकिशोर कंडारकर , गोभक्त शरद डुंगरवाल , प्राणीमित्र सय्यद मेहबूब चाचा , सीए शुभम डुंगरवाल , उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्राप्त अशोक कोटे , उत्कृष्ट कोरोना कार्यकर्ता कल्पेश औस्तवाल यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत गौतम प्रसादी म्हणजे भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे .तसेच दुपारी बारा वाजता जैन ग्रंथसाहित्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या महोत्सवाला सामाजिक टच देण्यात आला आहे. रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे .गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालय दयाराम रोड येथे आयोजित रक्तदान शिबिर व जैन ग्रंथ साहित्य प्रदर्शनीत सहभागी व्हावे , असे आवाहन स्वागताध्यक्ष राजीव बुबणे यांनी केले आहे. या भगवान महावीर जयंती महोत्सव उपस्थित रहावे असे आवाहन श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष राजीव बुबणे, तेरापंथ सभेचे अध्यक्ष सुरेश जैन , लातूर जैन मंडळाचे अध्यक्ष तेजमल बोरा , श्री वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघाचे सुमतीलाल छाजेड व सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.