16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeउद्योग*' महाराष्ट्र क्रेडाई आपल्या दारी ' उपक्रमास प्रतिसाद*

*’ महाराष्ट्र क्रेडाई आपल्या दारी ‘ उपक्रमास प्रतिसाद*

लातूर; दि.२५ (प्रतिनिधी )– बांधकाम व्यवसायिकांची देश पातळीवरील संघटना म्हणून ज्याची ओळख आहे अशा कॉन्फ्रेडडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया ( क्रेडाई) या संघटनेच्या वतीने ‘ महाराष्ट्र क्रेडाई आपल्या दारी ‘ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून , या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे .


महाराष्ट्र क्रेडाई संघटनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांची कार्यशाळा लातूर शहरात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्ह्यासह परिसरातील बांधकाम व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष सुबोध बेळंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यशाळेत महाराष्ट्र क्रेडाई संघटनेचे राज्याध्यक्ष सुनील फुरडे , उपाध्यक्ष रवी काडगे , ,समन्वयकव राज्य विस्तारक डॉ धर्मवीर भारती आदींनी उपस्थित राहून बांधकाम व्यवसायिकांना मार्गदर्शन केले. मंचावर शशिकांत जिद्यिमनी ,आदित्य बेडेकर ,अभिनव साळुंके आदींची उपस्थिती होती. दोन सत्रामध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली .

पहिल्या सत्रामध्ये मान्यवरांनी बांधकाम व्यवसायिकांना मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रामध्ये उपस्थित व्यावसायिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मान्यवरांनी समर्पक उत्तरे दिली आणि परिचय करून दिला. सुनील फुरडे यांनी बांधकाम व्यवसायिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की , रेरा कायद्याअंतर्गत प्रकल्पाची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्या पुढील प्रक्रियेसाठी बांधकाम व्यवसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने ‘महाराष्ट्र क्रेडाई आपल्या दारी ‘ हा उपक्रम राज्यातील ६५ जिल्ह्यात राबवण्यात येत आहे.

या उपक्रमास राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे .बांधकाम व्यवसायिकांचे प्रश्न , त्यांचे संघटन या उपक्रमातून सोडवण्यात संघटनेला यश मिळत आहे अशी माहिती क्रेडाई संघटनेचे राज्याध्यक्ष सुनील फुरडे यांनी यावेळी बोलताना दिली .क्रेडाई महाराष्ट्र ही संघटना राज्यातील ७५ टक्के पेक्षा जास्त महत्त्वाच्या विकासाच्या संघटित बांधकाम क्षेत्रासाठी (मुंबई वगळता ) ओळखले जाते .बांधकाम व्यवसाय हा दुसऱ्या क्रमांकावरील व्यवसाय आहे , जिथे सर्वात जास्त रोजगार उपलब्ध होतो. देशाच्या उत्पन्नात आठ ते नऊ टक्के वाटा याच व्यवसायाचा आहे असेही ते म्हणाले.
धर्मवीर भारती यावेळी बोलताना म्हणाले की , महाराष्ट्र क्रेडाई ही संघटना बांधकाम व्यवसायिकांसाठी भरीव कार्य करीत असून , या कार्याची देशपातळीवरील संघटनेने दखल घेतली आहे आणि संघटनेच्या कार्याचे कौतुक केले आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले .


क्रेडाई महाराष्ट्र या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक सुबोध बेळंबे यांनी यावेळी आपल्या छोटेखानी भाषणात संघटनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. आपल्या कारकिर्दीत काय केले आणि भविष्यात काय करणार आहोत याची माहिती दिली. क्रेडाई ची वार्षिक परिषद लातूरला घेण्याची संघटनेने परवानगी द्यावी . लातूर पॅटर्नला साजेशी अशी ही परिषद होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. संघटनेचे सरचिटणीस उदय नावंदर यांनी प्रास्ताविक केले .उपाध्यक्ष उदय पाटील यांनी आभार मानले .


या कार्यशाळेत जगदीश कुलकर्णी , श्रीकांत हिरेमठ ,दीपक कोटलवार , आशिष कामगार , चेतन पंढरीकर,यांच्यासह सदस्य संतोष हत्ते, विष्णू मदने, दत्ता परशुराम, अमोल मुळे, किरण मंत्री, प्रकाश गुंजी, सुशांत काळे,नागनाथ गिते, जयकांत गिते, गोविंद मदने ,चंद्रकांत बिराजदार, संतोष हत्ते,चाँद शेख ,भागवत खंडापुरे,प्रवीण ब्रिजवासी, दीपक शिवपुजे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील इतर बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रेडाई महाराष्ट्राच्या वुमन विंगच्या वतीने सुनील फुर्डे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .यावेळी वुमन विंगच्या लातूर समन्वयक रश्मी बेळंबे , सह समन्वयक ऋचा नावंदर यांच्यासह इतर आदींची प्रमुख उपस्थिती होती. बांधकाम व्यवसायिकातील कुटुंबांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला विंगची स्थापना करण्यात आली असून वुमन्स विंग या संघटनेची स्थापना करण्यात आली असून , या संघटनेच्या वतीने येत्या 20 ऑगस्ट रोजी पुणे येथे ‘फेमिकॉन ‘ या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .केवळ महिला सदस्यच या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत . या परिषदेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष सुनील फुर्डे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]