नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत येणाऱ्या होमिओपॅथी अभ्यास मंडळावर लातूरच्या डॉ रत्नेश्वर धानुरे यांची निवड झाली आहे. डॉ रत्नेश्वर हे उदगीर येथील माऊली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सर्व शाखांच्या समित्या स्थापन करण्यासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत होमिओपॅथी विभागातून महाराष्ट्र होमिओपॅथीक कॉलेज फेडरेशन प्रणित विकास आघाडीने १३ जागा जिंकत घवघवीत यश संपादन केले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र होमिओपॅथी मेडिकल कॉलेज फेडरेशनचे अध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
आगामी काळात होमिओपॅथीच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच या शाखेच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे डॉ रत्नेश्वर यांनी सांगितले. या निवडीचे लातूर जिल्ह्यासह राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.