28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeराजकीय*महाराष्ट्रात सत्तानाट्य शिगेला पोहचले असताना राज्यपालना कोरोना ; रुग्णालयात दाखल*

*महाराष्ट्रात सत्तानाट्य शिगेला पोहचले असताना राज्यपालना कोरोना ; रुग्णालयात दाखल*

मुंबईः ( विशेष प्रतिनिधी)-

महाराष्ट्रात राजकरण ढवळून निघालं असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रात घडत असलेल्या सत्ता नाट्यात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने सरकार संकटात आले आहे. एकनाथ शिंदे यांना ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे समर्थक आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या रंगत चाललेल्या राजकीय नाटयात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यपालाना ताप येत होता. खबरदारी म्हणून त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचे अहवाल आज आले असून त्यांना करोना झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज सकाळीच राज्यपाल कोश्यारींना रिलायन्स रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे नाराज आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भाजपला समर्थन देत असल्याचं पत्र देणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयात दाखल केल्यामुळे आता ही प्रक्रिया अजून दोन ते तीन दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]