30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्र*महाराष्ट्रराज्यातील ४१ आयएएस अधिका-यांच्या बदल्या*

*महाराष्ट्रराज्यातील ४१ आयएएस अधिका-यांच्या बदल्या*

वर्षा ठाकूर लातूरच्या जिल्हाधिकारी

राज्यातील ४१ आयएएस अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधी राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. अवघ्या एका महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांना आता पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदाचा पदभार देण्यात आला आहे.

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी पुढीलप्रमाणे,
१. राजेंद्र शंकर क्षीरसागर – मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. वर्षा ठाकूर-घुगे – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हाधिकारी लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३. संजय चव्हाण – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. आयुष प्रसाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५. बुवनेश्वरी एस – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची जिल्हाधिकारी, वाशिम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६. अजित कुंभार – सह आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची अकोला येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

७. डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ, – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांची जिल्हाधिकारी, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
८. डॉ. पंकज आशिया – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

९. कुमार आशीर्वाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, गडचिरोली यांची जिल्हाधिकारी, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१०. अभिनव गोयल – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांची जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

११. सौरभ कटियार – मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, अकोला यांची जिल्हाधिकारी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१२. तृप्ती धोडमिसे – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१३. अंकित,- प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१४. शुभम गुप्ता, – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली एसडीओ, पो.भारमरागड, आयटीडीपी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी झेडपी, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१५. मीनल करनवाल, – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, आयटीडीपी, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१६. डॉ. मैनाक घोष – प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१७. मनीषा माणिकराव आव्हाळे – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, आयटीडीपी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१८. सावन कुमार – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी, आयटीडीपी अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी., नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१९. अनमोल सागर – सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२०. आयुषी सिंह – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, आयटीडीपी, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२१. वैष्णवी बीव – सहायक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., अकोला.
२२. पवनीत कौर. -जिल्हाधिकारी, अमरावती यांची संचालक, जीएसडीए, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२३. गंगाथरण डी – जिल्हाधिकारी, नाशिक यांची बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२४. अमोल जगन्नाथ येडगे, – जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२५. शनमुगराजन एस, – जिल्हाधिकारी, वाशिम यांची अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२६. विजय चंद्रकांत राठोड, – जिल्हाधिकारी, जालना यांची सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२७. निमा अरोरा. – जिल्हाधिकारी अकोला यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२८. वैभव दासू वाघमारे – यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२९. संतोष सी. पाटील – उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, कोल्हापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३०. आर.के.गावडे – मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३१. आंचल गोयल – जिल्हाधिकारी, परभणी यांना अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
३२. संजय खंदारे, – यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३३. तुकाराम मुंढे, – सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची सचिव, कृषी आणि एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३४. जलज शर्मा. – जिल्हाधिकारी धुळे यांची जिल्हाधिकारी, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
३५. डॉ. ए.एन.करंजकर- आयुक्त, ईएस्आयएस, मुंबई यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३६.आर.एस.चव्हाण, – सहसचिव, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
३७. रुचेश जयवंशी – यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, एनआरएलएम, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३८. पृथ्वीराज बी.पी. – जिल्हाधिकारी, लातूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३९. मिलिंद शंभरकर, – जिल्हाधिकारी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४०. मकरंद देशमुख – उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४१. डॉ. बी.एन.बस्तेवाड – मुख्य महाव्यवस्थापक , मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]