इनर व्हिल क्लब ऑफ चाकूर च्या वतीने सातारा – पाटण येथील पूरग्रस्त महिलांसाठी विशेष मदत
———————————————————
चाकूर : येथील इनर व्हिल क्लब ऑफ चाकूर च्या वतीने सातारा व पाटण येथील पूरग्रस्त महिलांसाठी अन्नधान्य, सॅनटरी नॅपकिन, औषधी, साबण, टॉवेल, साड्या यासोबतच महिलांसाठी अत्यावश्यक व गरजेच्या असणाऱ्या वस्तूंचे किट बनवून पाठवण्यात आले आहेत. गरजू महिलांसाठी क्लब च्या महिलांनी स्वखर्चाने मदत करून आदर्श निर्माण केला आहे.
महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे तेथील नागरिकांचे जीवन उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे सातारा व पाटण येथील रोटरी क्लब च्या वतीने महिलांना अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी व वस्तूंसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला चाकूर च्या इनर व्हिल क्लब ने प्रतिसाद देत जीवनावश्यक वस्तू देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, पोहे, तुर डाळ, चना डाळ, मसूर डाळ, मुग डाळ, हळद, मीठ, तेल, बिस्कीट, ब्रश, पेस्ट, पावडर, साबण, सॅनेटरी पॅड, साडी, टॉवेल, बेडशीट, अंतर्वस्त्र, चवीसाठी लोणचे आदी वस्तूंचे महिनाभर पुरेल असे शंभर किट बनवले आहेत. क्लबच्या अध्यक्षा डॉ.अंजली स्वामी, उपाध्यक्षा सुषमा सोनटक्के, सचिव शारदा मिरजकर – अंतुरे, सहसचिव उषा महालिंगे, मीना हाके, सुनंदा हिप्पाळे, कार्यकारी सदस्य सविता स्वामी, माधुरी पाटील, राजश्री साळी, रत्नमाला नंदागवळे, सुनीता फुलारी, प्रणिता बेजगमवार, साधना कुलकर्णी, सुरेखा सोनटक्के, लक्ष्मी काटे, वसुंधरा मुंडे, संगिता असोले, संगिता मोरगे, वंदना सावंत आदींनी मदतीचा हात पुढे करत स्वखर्चातून हे कार्य केले आहे. हे किट रोटरी क्लब ऑफ चाकूर च्या माध्यमातून सातारा व पाटण येथील गरजू लोकांना पाठवण्यात आले आहेत. या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.