24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeताज्या बातम्या*मरावे परी कीर्ती रूपे उरावे*

*मरावे परी कीर्ती रूपे उरावे*


लातूरच्या सिंधुताई तळवार यांनी अवयवदान करून दिले तिघांना नवजीवन
•तळवार कुटुंबियांच्या निर्णयाला लातूर जिल्हा प्रशासनाची साथ
•काल सोलापूरात झाली अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण

लातूर शहरात राहणाऱ्या सिंधुताई सिद्राम तळवार (वय 64 वर्ष) यांना अर्धांगवायूचा अटॅक आला आणि या अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर ईजा झाली. त्यांना तात्काळ लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांचं ब्रेन डेड झाल्याचं निदान केलं. त्यांची मुले, जावई विजय कोळी(जि.प.शिक्षक) त्यांचे सहकारी विजय माळाळे, रामेश्वर गिल्डा यांनी सिंधुताई यांचे अवयवदान करण्याचा मानस व्यक्त केला आणि समुपदेशन करून कुटुंबियांना या सर्वोच्च दानासाठी प्रेरित केले.


विजय माळाळे सर जे माझं लातूर परिवाराचे क्रियाशील सदस्य आहेत त्यांनी रविवारी (दि.24) मला ही संपूर्ण माहिती दिली आणि ही प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख, डॉ संतोष डोपे, डॉ उदय मोहिते यांना या घटनेची माहिती दिली गेली आणि आश्चर्य…अवघ्या दोन तासात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या अवयवदान संकल्पाला पूर्णत्वास नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही कारणास्तव ही प्रक्रिया लातूरमध्ये करणे शक्य नव्हते तेंव्हा जिल्हा प्रशासनाने सोलापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून ही प्रक्रिया यशस्वी होईल याची पूर्ण खात्री केली. त्याच दिवशी रुग्णवाहिका, तज्ञ डॉक्टर आणि सोबत अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यासह सिंधुताई यांना सोलापूरला नेण्यात आले.
तेथील सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून आज सोलापूरमध्ये अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यात किडनी, लिव्हर, डोळे अशा तीन अवयवांचे तीन गरजू रुग्णांना प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. हे अवयव पुणे येथे नेण्यासाठी सोलापूरमध्ये आज ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला.
सिंधुताई तळवार यांच्या मुलांनी घेतलेल्या या निर्णयाने आणि या सर्वोच्च दानासाठी प्रेरीत करणारे त्यांचे जावई जि प शिक्षक विजय कोळी सर, विजय माळाळे सर, रामेश्वर गिल्डा सर यांच्या प्रयत्नांना यश आले असून 3 गरजू रूग्णांना नवजीवन मिळाले आहे.
आज सकाळी 11 वाजता सिंधुताई यांच्या पार्थिवावर खाडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

सतीश तांदळे
माझं लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]