“ज्येष्ठ गायिका अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचे दुःखद निधन”
७० वर्षांच्या किर्तीताई गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मावळली. वडील जयराम आणि आई जयमाला शिलेदार यांच्याकडून किर्ती शिलेदार यांना कलेचा वारसा मिळाला होता.
तमाशातल्या मैनेपासून ते शास्त्रीय संगीतपर्यंतच्या गायणाच्या अनेक छटा किर्ती शिलेदार यांनी यशस्वीपणे सादर केल्या. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी संगीत रंगभूमी पाऊल ठेवले आणि अनेकांची मने जिंकली. विविध संगीत नाटकांचे त्यांनी चार हजारांहून अधिक प्रयोग सादर करत ते गाजवले. भारतासह परदेशात संगीत नाटकांचे प्रयोग, नाट्यपदांच्या मैफली, सप्रयोग व्याख्याने त्यांनी दिली आहेत. पारंपरिक संगीत नाटकांप्रमाणेच स्वरसम्राज्ञी, अभोगी, मंदोदरी आदी वेगळ्या धाटणीची नाटकेही त्यांनी गाजवली. यातील एकच प्याला, कान्होपात्रा, द्रौपदी, मानापमान, ययाति आणि देवयानी, शाकुंतल, संशयकल्लोळ, सौभद्र अशा संगीत नाटकांत त्यांनी काम केले. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मनस्वी आणि अतिशय कणखर व्यक्तीमत्वाच्या
मराठी संगीत रंगभूमीवर आपल्या अभिनय पूर्ण नाट्यसंगीताने भारावून टाकण्याऱ्या..
जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार यांच्या परंपरेला पुढच्या पिढीपर्यंत पोचविणाऱ्या…
बाणेदार आणि तेजस्वी बाण्याच्या..
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो…
भावपुर्ण श्रद्धांजली!
🙏😥