डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील बैठकीस उपस्थित राहावे – अनिल वाघमारे
पुणे/प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक ही येत्या १६ जुलै २०२३ रोजी पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सकाळी ११ वाजता होत आहे.या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे सखोल मार्गदर्शन लाभणार आहे.तरी महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीस आवर्जुन उपस्थित राहावे.असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेची पुढील दिशा ठरविण्यासाठी त्याचबरोबर परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि त्यांच्या कुटुंबावर सातत्याने केले जाणारे आरोप. त्या आरोपांवर चर्चा करून परिषदेची याबाबतची भूमिका नक्की करण्यासाठी त्याचबरोबर परिषदेची चळवळ संपवून टाकण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न.. तसेच परिषदेच्या रिक्त जागा वरील नियुक्त्या,डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष,जिल्हा निमंत्रक पदाच्या नियुक्ती बाबत चर्चा करून निर्णय होणार आहेत. याशिवाय कर्जत,बीड,नाशिक आणि मुंबईतील कार्यक्रम यशस्वी करून दाखविल्याबद्दल आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सत्कार एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.तरी महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष यांनी आपली सर्व कामे अगोदरच पुर्ण करावेत. येणारी १६ जुलै २०२३ रोजी ची तारीख राखीव ठेऊन या तारखेला पुण्यात होत असलेल्या महत्वाच्या बैठकीत सहभागी व्हावे. त्याच बरोबर मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी, माजी अध्यक्ष,विभागीय उपाध्यक्ष, विभागीय संघटक,विभागीय सचिव,महिला आघाडी पदाधिकारी,जिल्हा अध्यक्ष,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, जिल्हा प्रतिनिधी अशा सर्वांनी उपस्थित राहावे.
या बैठकीत विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर,सरचिटणीस शेख मन्सुरभाई, कोषाध्यक्ष विजय जोशी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.एवढी विस्तृत आणि व्यापक बैठक परिषदेच्या इतिहासात प्रथमच होत असल्याने बैठकीचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांचा बैठकीत सहभाग आवश्यक आहे.सर्वांनी या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी पत्रकार परिषदेची चळवळ अधिक गती शील करण्यासाठी मदत करावी.कोणालाही स्वतंत्र निमंत्रण पाठवले जाणार नाही याची सर्वांनी नोंद घेऊन सहकार्य करावे.
बैठकीचे स्थळ पुणे येथील कृषी महाविद्यालय शिवाजीनगर बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे.तरी या बैठकीस महाराष्ट्र राज्यातील मराठी पत्रकार परिषदेच्या व डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.