माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची अध्यक्षपदी तर आकाश मोहिते यांची उपाध्यक्ष पदी निवड.
सांगली (प्रतिनिधी)
महाराष्ट्रा मधे दहा लाख मराठी उद्योजक निर्माण करण्याचे ध्येय असलेली आपल्या मराठी बांधवांना नवीन उद्योग धंदा निर्माण करण्यासाठी प्रेरित करणारी अवघ्या काही महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात आपले जाळे निर्माण करणार आहे अशी संघटना ” मराठी उद्योजक मदत केंद्र” याची काल भाजपचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळिराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली बैठक पार पडली.
यावेळेस बोलताना डॉ सुनील गायकवाड म्हणाले की,येत्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आपण जवळपास दहा लाख मराठी उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आपली कोअर टीम तयार करून आपल्याला सर्वांना एकत्रित व एकजुटीने काम करायचे आहे . केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार च्या सर्व प्रकारच्या सरकारी योजना व्यवसायासाठी लागणारे मार्गदर्शन आपण आपल्या संस्थे मार्फत करणार आहोत.

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी जाहीर
या वेळी संस्थेचे मार्गदर्शक व सर्वेसर्वा मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
१) प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड (लातूर) अध्यक्ष पदी निवड
२) आकाश मोहिते (सांगली). महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड
२) संस्कार पवार ( सांगली ) कार्यकारी सदस्य
४) ज्ञानेश्वर वारपे (ठाणे ). कार्यकारी सदस्य
५) सतीश शिंदे ( नाशिक ) कार्यकारी सदस्य
६) संदीप पवार ( कोल्हापूर). कार्यकारी सदस्य
७) संदीप वंजारे ( कोल्हापूर ) कार्यकारी सदस्य
८) राजेश एरंडे ( सोलापूर ) कार्यकारी सदस्य
९)शरद पाटील (पुणे ). कार्यकारी सदस्य
१०)विनायक गायकवाड ( मुंबई ) कार्यकारी सदस्य
त्याच प्रमाणे नवीन उद्योजकांनी याचा लाभ घेण्यासाठी फेसबुक पेज वरती जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.