24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीयमराठवाड्यातील तरूणांना मराठवाड्यातच रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील राहू - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यातील तरूणांना मराठवाड्यातच रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील राहू – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


लातूर दि.13-04-2022


2014 मध्ये भाजपाची सत्ता असताना 33 लाख बचतगटांना 200 कोटी बिनव्याजी कर्ज देण्याचे काम केलेले आहे. तसेच मराठवाड्यासाठी मराठवाडा वाटरग्रिड प्रकल्प मंजूर केला. तसेच राज्यात 50 हजार कोटीची कामे करण्याचे काम केलेले आहे. परंतु या विकासकामाला खीळ पाडण्याचे काम राज्यातील विद्यमान सरकारने केलेले आहे. मराठवाड्यातच पुन्हा लोडशेडींग सुरु केली आहे. कारखानदारीमध्ये राजकारण शिरल्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यावर ऊस जाळून टाकण्याची वेळ आलेली आहे. तर काही उत्पादन शेतकर्‍यांवर पक्षाचे शिक्के पडल्यामुळे त्यांच्या ऊसाची अडचण निर्माण झालेली आहे. उद्योगाला लाईटची सबसीडी होती. ती सबसीडी बंद करण्याचे काम राज्यातील सत्ताधारी सरकारने केलेले आहे. त्यामुळे नवीन उद्योग येतील कशाला अशी खंत व्यक्‍त करत यापुढील काळात मराठवाड्यातील तरूणांना उद्योगाच्या माध्यमातून मराठवाड्यातच रोजगार निर्मिती होईल यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले.


यावेळी ते जेएसपीएम शिक्षण संस्था, एमएनएस बँक व जननायक संघटना यांच्या संयुक्‍त विद्यमाने विवेकानंदपूरम् शैक्षणिक संकूल परिसरात आयोजित स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या भव्य इमारतीचे भूमिपूजन, लाईफ लाँग लर्निंग निरंतर शिक्षण योजनेअंतर्गत सॅटेलाईट केंद्राचे उद्घाटन, बांगालादेशी मा.युनूस अहेमद महिला सशक्‍तीकरणासाठी राष्ट्रामाता जिजाऊ स्वाभिमानी योजनेच्या दूसर्‍या टप्प्याचा शुभारंभ व भारतीय अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव सोहळ्यात बोलत होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री गिरीष महाजन, माजी कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, नांदेड विद्यापीठाचे कुलगुरु उध्दवजी भोसले, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे, औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषदेचे आमदार रमेशअप्पा कराड, जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी मंत्री विनायकराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केेंद्रे, माजी आ.पाशा पटेल, माजी आ.सुधाकर भालेराव, माजी आ.गोविंद केंद्रे, भाजपा प्रदेश सचिव गणेश हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दिलीपराव देशमुख, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, पतंजलि योग समितीचे विष्णूजी भूतडा, जननायक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोरे, रिपाईचे प्रदेश सचिव चंद्रकांत चिकटे, मिलींद पाटील, व्यंकटेश हालिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जेएसपीएम संस्थेच्या सचिव तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएम संस्थेचे कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील कव्हेकर, काजल पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, आप्पासाहेब पाटील, प्राचार्य आर.एस.अवस्थी,विश्‍वजीत पाटील कव्हेकर, प्रा.सतीश यादव, नगरसेविका रागिणी यादव, प्रकाश पाटील वांजरखेडकर, अ‍ॅड.रामभाऊ गरड, एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस म्हणाले जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारीत तेजस्वी विद्यार्थी घडविण्याचे काम कव्हेकरांनी सुरु केलेले आहे. त्यांच्या या संस्थेतून संस्कार व विचारातून मानव संसाधने निर्माण करण्याचे कामही केले जात आहे. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सीबीसीएस शिक्षण पध्दतीच्या माध्यमातून सीबीएसई शिक्षण देण्याचे काम सुरु केलेले आहे. या पध्दतीमुळे जो शिकेल त्याला नोकरी मिळेल हे वास्तव कोरोनातून समोर आलेले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना ऑलनाईन शिक्षणपध्दतीचा अवलंब करावा लागला ते ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये चांगलेच रूजलेले आहे. त्यामुळे भविष्यात डिजिटल युनिव्हर्सिटीसाठी प्रयत्नशील राहू असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
स्वतंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 वर्षांनी मराठवाडा स्वातंत्र झाला. हे वास्तव कव्हेकरांनी विकासात्मक दृष्टीने समोर आणलेले आहे. जे इतिहास विसरतात त्यांना वर्तमानही व भविष्यातही भविष्य नसते. परंतु कव्हेकर परिवाराला भविष्य चांगले आहे. त्यांनी जेएसपीएम संस्था व बँकेच्या माध्यमातून यापुढील कालावधीतही यशस्वी वाटचाल करावी. अशी अपेक्षाही माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्‍त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले. तसेच प्रमुख मान्यवरांचा सत्कार, एमएनएस बँकेच्यावतीने पाच महिलांना विनातारण कर्ज वाटप व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पाच स्वातंत्र्य सैनिकांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक अब्दूल गालिब शेख यांनी मानले व आभार जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी मानले.  

देवेंद्र फडणवीस राहणार उद्याचे सीएम- केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले.


राज्य व देश पातळीवरील राजकारण करीत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी प्रामाणिकपने जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण करण्याचे काम केलेेले आहे. तब्बल 30 युनिट, 800 कर्मचारी व 15 हजार विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे काम त्यांनी सुरु केलेले आहे. असे म्हणत. मला आहे कविता करण्याचा छंद, शांतीदूत होते विवेकानंद आणि कव्हेकर साहेबांना आहे शिक्षणाचा छंद.. शिवाजीराव आपल्या संस्थेचे नाव आहे जेएसपीएम अन् देवेंद्र फडणवीस राहणार उद्याचे सीएम असे भाकीत अध्यक्षीय भाषणात केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

श्रावणबाळ घडविणारं जेएसपीएम – माजी मंत्री आ.गिरीष महाजन
लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे. शिक्षणात लातूर पॅटर्न ही ओळख जगभरात झाली आहे. त्याच शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम माजी आ.कव्हेकर यांनी सुरु केलेले आहे. मी राजकीय क्षेत्रात अनेक डॉक्टर्स, इंजिनियरर्स, वकील पाहिले पण ते आई-वडिलांसोबत ते राहत नाहीत हे वास्तव आहे. परंतु कव्हेकरांनी मात्र शिक्षणाबरोबर सुसंस्कृतपणा देवून स्पर्धेच्या युगातही आई-वडिलांना सांभाळणारे श्रावणबाळ घडविण्याचे काम सुरु केलेले आहे. तसेच एमएनएस बँकेच्या माध्यमातून त्यांनी दहा हजार महिलांना विनातारण कर्ज देण्याचे काम केलेले आहे. मी 32 वर्षापूर्वी पतसंस्था काढली उद्घाटनादरम्यान ज्यांना कर्ज वाटप केले त्यांनी अद्यापही कर्जाची परतफेड केलेली नाही. परंतु तुम्ही हे काम अत्यंत सक्षमपणे पार पाडता ही सर्वांच्या दृष्टिने कौतुकाची बाब आहे असंही माजी मंत्री गिरीष महाजन यावेळी बोलताना म्हणाले.
.फडणवीसांनी पुन्हा राज्यात यावे  – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
राज्याचे मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक विकासकामे केली. दूसर्‍यांदाही प्रचंड बहुमत असतानाही विरोधकांच्या राजकीय खेळीमुळे त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. परंतु राज्यातील जनतेला त्यांच्यातच विकासाचा महामेरू दिसून येत आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राज्यात यावे. अशी अपेक्षा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त करून जेएसपीएम संस्थेच्या प्रगतीचा आढावाही सादर केला.

केंद्रिय विद्यापीठ लातूरला व्हावे – माजी पालकमंत्री निलंगेकर
लातूर ही शिक्षणाची पंढरी आहे. येथील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी व नोकरीसाठी बाहेर देशात जात आहेत. ही लातूरकरांच्या दृष्टीने आनंदची बाब आहे. याच शिक्षणाच्या पंढरीमध्ये योगदान देणार्‍या जेएसपीएम संस्थेमध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे नियेाजन कसे करावे? ते कव्हेकर साहेबांकडून शिकावे. त्यामुळे खर्‍या अर्थाने शिक्षणाच्या माध्यामातून दिशा देणारी संस्था म्हणजे जेएसपीएम संस्था हे नाव समोर आलेले आहे. युके्रन-रशिाच्या युध्दामध्ये लातूरच्या 28 विद्यार्थ्यांसह देशभरातील विद्यार्थी अडकले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतीन यांना फोन जाताच बाँबींग थांबली आणि  देशातील विद्यार्थी सुखरूप आले. तेथे पाकीस्थानी विद्यार्थीही होते ते भारताचा झेंडा घेवून बाहेर आले. लातूरला सदैव सढळ हाताने मदत झालेली आहे. केंद्रिय समाजकल्याण विभागाकडून 1 लाख 42 हजार कोटीचे बजेट मिळाले. सर्वांची अस्मिाता असणारे घटनेेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 72 फुट ऊंचीचा पुतळा लातूरचा उभारण्यात आलेला आहे. यापुढील कालावधीतही लातूरची शैक्षणिक प्रगती कायम ठेवण्यासाठी लातूरला केंद्रिय विद्यापीठ द्यावे, अशी अपेक्षाही राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्‍त केली.
——————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]