
- आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आवाहन
- निलंगा/प्रतिनिधी: वर्षानुवर्ष होणाऱ्या अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यात कायमच पाणीटंचाई असते.कायम दुष्काळी भाग असा शिक्का बसलेल्या मराठवाड्याची कोरड दूर करण्याची संधी सरकारच्या निर्णयामुळे आपल्याला मिळाली आहे.
मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी जलसाक्षरता अभियानाला साथ द्या,असे आवाहन आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी आ.
निलंगेकर यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यात जलसाक्षरता अभियान राबविले जात आहे.या अभियानाच्या तिसऱ्या दिवशी तालुक्यातील शिरुर अनंतपाळ,येरोळ,जवळगा,वलांडी,देवणी,मोघा आदी गावात दुचाकी रॅली पोहोचल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना आ.निलंगेकर बोलत होते.- शिरूर अनंतपाळ येथे ज्येष्ठ नेते ॲड.संभाजीराव पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगांवकर,तालुकाध्यक्ष मंगेश पाटील,काशिनाथ गरीबे,ऋषिकेश बद्दे, प्रशांत पाटील,गोविंद चिलकुरे,रामलिंग शेरे आदींची यावेळी उपस्थिती होती.दरम्यान माजी आमदार सुधाकर भालेराव हे देखील पांढरवाडी येथून अभियानात सहभागी झाले.
यावेळी संवाद साधताना आ.निलंगेकर म्हणाले की,
भौगोलिक परिस्थितीनुसार मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडतो.त्यामुळे या परिसरात कायम पाणीटंचाई असते.महिला – पुरुषांना पाण्यासाठी भटकावे लागते.
सिंचनाला तर पाणी मिळतच नाही.ही परिस्थिती दूर करण्यासाठी राज्य शासनाने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.या अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या मातीची तहान भागविण्यासाठी साथ द्या,असे आवाहन त्यांनी केले.
मागील तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या जलसाक्षरता अभियानात गुरुवारी उपस्थितांशी संवाद साधताना आ.निलंगेकर म्हणाले की मराठवाड्यात अत्यंत कमी पाऊस पडतो त्यामुळे दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे.अशा स्थितीत सिंचनासाठी सोडा पिण्यासाठीही पाणी मिळत नाही.ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य शासनाने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.हे पाणी मांजरा व तेरणा खोऱ्यात सोडावे,ही आपली प्रमुख मागणी असून यासाठी जनरेटा आवश्यक आहे. त्यासाठीच हे अभियान सुरू केले असून मराठवाड्याच्या मातीची तहान भागविण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार निलंगेकर यांच्या नेतृत्वातील जलसाक्षरता अभियान तिसऱ्या दिवशी शिरूर अनंतपाळ येथे नगरपंचायत,ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, महिला बचत गट सदस्य तसेच असंख्य महिला व पुरुषांनी यात सहभाग घेतला.विशेष म्हणजे गुरुवारी नव्याने ५०० दुचीकी व त्यावरील १ हजार तरुण जलयोद्धे म्हणून रॅलीत सहभागी झाले.
गावोगावी ढोल-ताशा व हलगीच्या निनादात, फटाक्यांची आतिषबाजी तसेच गुलाल व फुलांची उधळण करत दुचाकी रॅलीचे स्वागत करण्यात आले.

वरूणराजाचा आशीर्वाद…
पाऊस नसल्यामुळे लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे.ही दुष्काळी परिस्थिती कायमची हटवण्यासाठी हे जलसाक्षरता अभियान सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी शिरूर अनंतपाळ परिसरात दुचाकी रॅली पोहोचली असता प्रत्यक्ष वरूणराजाने अमृतधारांचा वर्षाव करत अभियानास आशीर्वाद दिला.पाऊस असाच कोसळावा.वरूण राजाने कृपा करावी आणि शेतकरी व जनतेवरील संकट दूर करावे,अशी प्रार्थना आ.निलंगेकर यांनी यावेळी केली.

घरातल्या कक्ष्मीसाठी शिवारात पाणी आवश्यक …
आज महालक्ष्मीचा सण आहे.प्रत्येक घरात महिला महालक्ष्मीची पुजा करत आहेत.लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा रहावी,ही सर्वांचीच इच्छा असते.पण घरातल्या लक्ष्मीसाठीही शिवारात पाणी आवश्यक आहे.
शिवारात पाणी असेल तर धनलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील.त्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आ.
निलंगेकर म्हणाले.