16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeसांस्कृतिक*मराठवाड्याच्या गावागावात मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास ; तो तरुणाई पर्यंत जायला हवा...

*मराठवाड्याच्या गावागावात मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास ; तो तरुणाई पर्यंत जायला हवा – ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे*

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला पुष्प पाचवे शिवाजी महाविद्यालय, रेणापूर येथे संपन्न

लातूर दि.23 ( जिमाका ) मराठवाड्याच्या गावागावात मुक्ती संग्रामाचा हा इतिहास लढला गेला. आपल्या मागच्या पिढ्यानी मोठं शौर्य गाजवून हा मुलूख निजामाच्या तावडीतून सोडवला आहे. हा जाज्वल्य इतिहास आजच्या तरुणाई पर्यंत जायला हवा. जाणकारांनी हा इतिहास मुद्दाम सांगायला हवा असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी केले
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प शिवाजी महाविद्यालय, रेणापूर येथे गुंफताना ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी मा युवराज पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ पी.आर.शिंदे, उपप्राचार्य डॉ गणेश नागरगोजे, डॉ सतीश यादव,श्री हुडे अप्पा, संयोजक डॉ. जयद्रथ जाधव उपस्थित होते.
यावेळी दगडे म्हणाले, निजाम,निजामाचे सैन्य व रझाकार असा हा लढा तीन पातळ्यांवर होता.स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे आणि बहुजन समाजातील असंख्य विरांनी हा लढा बुलंद केला.निजाम हा अत्यंत क्रुर, कपटी,जुलमी अत्याचारी शासक होता.निजामाची जुलमी शासन पध्दत तर सैन्याचा अत्याचार आणि रझाकारांचा छळ व सर्वसामान्यांची लूट या मुळे जनता त्रस्त होती.सत्तावीस हजार चौरस मीटर हा प्रदेश विकासापासून वंचित व उपेक्षित होता.अशा निजामाविरूध्द सामान्यांनी हा लढा बुलंद करत स्वातंत्र्य चळवळ सर्वसामान पर्यंत पोहचवली.


या मुक्ती संग्रामातील मुर्गाप्पा खुमसे, रामचंद्र मंत्री, मोहनराव पाटील, बळीराम पाटील, दगडाबाई शेळके, जीवनधर शहरकर यांच्या लढ्यातील रोमहर्षक शौर्य गाथा दगडे यांनी यावेळी सांगितल्या.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी आपल्या प्रास्तविकात मराठवाड्याचे प्राचीन जनपदाचे स्थान सांगून लातूर जिल्हा व मराठवाड्याचे देशातील वेगळेपण त्यांनी विशद केले. डॉ सतीश यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी लातूर आणि लातूर शहराच्या आवतीभोवतीचा इतिहास सांगितला. उपप्राचार्य डॉ पी.आर.शिंदे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]