36.7 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeक्रीडामराठवाड्याचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल लातूरला व्हावे

मराठवाड्याचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल लातूरला व्हावे

मराठवाड्याचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल लातूरला व्हावे
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन


लातूर : (प्रतिनिधी)विदर्भाचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल नागपूरला होत आहे तर पश्चिम महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुण्याला होत आहे़ महाराष्ट्राच्या विकासाचा समतोल साधण्यासाठी मराठवाड्याचे आंतरराष्ट्रीय क्रीडा सकुल लातूरला व्हावे़ त्यासाठी आम्ही पाठपूरवा करु, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले़.


माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन दि़ १६ एप्रिल रोजी झाले़ त्याप्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहूणे म्हणुन माजी मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त देविदास जाधव, रेणा कारखान्याचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड़ किरण जाधव, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, अभय साळुंके, अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे यांची उपस्थिती होती़
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पावलावर पाऊल टाकत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आपल्या सामाजिक जीवनाची सुरुवात केली़ आज आपण सारेजण माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करीत आहोत़

७५ वर्षे समाजामध्ये आपले स्थान अबाधित राखणे सोपे नाही, परंतु, ती किमया माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी करुन दाखवली, असे नमुद करुन माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले, लातूरच्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरु होणार आहे़ लातूर शहर महानगरपालिकेनेही स्वत:चे क्रीडा संकुल उभे करावे़ आज इन-डोअर स्पोर्टस् कॉम्पलेक्सची आवशयकता आहे़ त्यादृष्टीनेही प्रयत्न होणे आवश्यक आहे़ लोकप्रियता असलेल्या क्रीडा प्रकारांकडेच आज सर्वाधिक ओढा आहे, असे असले तरी कबड्डी, हॉकी यासारख्या पारंपारीक क्रीडा प्रकारालाही प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले़.


यावेळी बोलताना माजी मंत्री संजय बनसोडे यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची शिस्त, नियोजनाला तोड नाही़ विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांंनी सहकारात असंख्य संस्था सक्षमपणे उभ्या केल्या़ लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आज महाराष्ट्रात क्रमांक एकवर आहे़ माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर शहरात सर्व पक्षीय सत्कार सोहळा झाला पाहिजे़ त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे ही ते म्हणाले़ या प्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी मनोगत व्यत्क्त करताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच स्पर्धेत सहभागी खेळाडूंनाही उत्कृष्ट खेळ करण्याबाबत शुभेच्छा दिल्या़

———————–

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
मुलांच्या आठ तर मुलींच्या आठ संघांचा समावेश



माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते दि़ १६ एप्रिल रोजी झाले़ या स्पर्धेत राज्यभरातील मुलांच्या आठ तर मुलींच्या आठ संघांनी सहभाग नोंदविला आहे़ प्रारंभी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले़
मुलांचा पहिला सामना सांगली विरुद्ध मुंबई तर मुलींचा पहिला सामना पुणे विरुद्ध यवतमाळ संघात झाला़ या दोन्ही सामन्याचे उद्घाटन  यांनी केले़ तत्पुर्वी स्पर्धेच्या मुख्य उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक लातूर जिल्हा पार्सिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख यांनी केले़ त्यांनी यावेळी क्रीडा क्षेत्राशी संबंधीत अनेक मागण्या मांडल्या़ माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व माजी मंत्री संजय बनसोड यांनी या मागण्यांची पुर्तता केली जाईल, असे सांगीतले़ पाहुण्याचे स्वागत लातूर जिल्हा पार्सिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख, क्रीडा समितीचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, आयोजन समितीचे सचिव दत्ता सोमवंशी, अनंत देशमुख, महेश पाळणे, प्रविण पाटील यांनी स्वागत केले़ यावेळी स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले़
या वेळी दीपक सुळ, सोनू डगवाले, कैलास पाटील, विजय देशमुख, संतोष देशमुख, अ‍ॅड़ फारुक शेख, सुभाष घोडके, अ‍ॅड़ अंगद गायकवाड, अविनाश बट्टेवार, सिकंदर पटेल, चंद्रकांत चिकटे, प्रा़ अनंत लांडगे, अ‍ॅड़ गायकवाड, प्रा़ प्रविण कांबळे, प्रविण सूर्यवंशी, बालाजी वाघमारे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होती़ ही स्पर्धा दि़ १८ एप्रिल पर्यत चालणार आहे़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]