*ट्वेन्टीवन ऑर्गॅनिक लि. माध्यमातून शेतकरी ते थेट ग्राहक सेंद्रिय शेती*
*उत्पादन विक्री व्यवस्थेचे खासदार राजन विचारे व*
*सिडकोचे कार्यकारी संचालक संजय मुखर्जी यांच्या हस्ते उद्घाटन*
*ऑर्गॅनिक फार्मर्स मार्केट मुंबईकरांच्या मनात*
*शेतीबद्दल जागरूकता निर्माण करेल*
– *अमित विलासराव देशमुख*
*लातूर (प्रतिनिधी): (मंगळवार दि. ६ डिंसेबर २०२२)*
शेतकरी ते थेट ग्राहक सेंद्रिय शेती उत्पादन विक्री हा उपक्रम मराठवाडयातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरीता मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट आणि गोल्डक्रेस्ट हाय, वाशी या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांसाठी नवीन संधी निर्माण करीत आहे, यातून शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये एक रास्त भावात शेतीउत्पादनाची बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच शहरी भागात सेद्रींय शेती बददल जागरूकता निर्माण होईल असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले.
मराठवाडयातील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेली सेंद्रीय उत्पादने व भाजीपाला मुंबईतील नागरीकांना उपलब्ध व्हावीत, शेती आणि शेतकऱ्यांची मुंबई शहरातील विदयार्थ्यांना ओळख व्हावी. तसेच मराठवाडयातील शेतकर्याना थेट पध्दतीने मुंबईतील ग्राहकास रास्त दरात आपली उत्पादने विकता यावीत यासाठी ट्वेन्टीवन ऑर्गॅनिक लि.,कडून सौ.अदिती अमित देशमुख यांनी पूढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून गोल्डक्रेस्ट हाय, वाशी, मुंबई येथे सेंद्रिय शेती उत्पादन विक्री उपक्रम आयोजिक करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन खासदार राजन विचारे व सिडकोचे कार्यकारी संचालक संजय मुखर्जी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या कार्यक्रमास ट्वेन्टीवन ऑर्गॅनिक लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख, मनपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, प्राचार्य सौ. कवीता मल्होत्रा, डॉ. सविता साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख बोलतांना म्हणाले, शेतकरी ते थेट ग्राहक सेंद्रिय शेती उत्पादन विक्री हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरीता मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट आणि गोल्डक्रेस्ट हाय, वाशी या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांसाठी अशा प्रकारच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी सतत
प्रयत्न करत राहतील. यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये एक रास्त भावात शेतीउत्पादनाची बाजारपेठ उपलब्ध होईल. यानिमीत्ताने शेती, शेतकरी आणि शहरातील नागरीकांमध्ये दुवा जूळेल यातून शहरवाशींयाना शेतकऱ्या बाबत आपूलकी निर्माण होईल. सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता देखील वाढेल. या पूढील काळात या उपक्रमाच्या माध्यमातून
गोल्डक्रेस्ट हाय, वाशी येथे दर शुक्रवारी सेद्रीय उत्पादक शेतकऱ्यांची सेंद्रीय उत्पादने उपलब्ध होतील. यातून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगीतले आहे.
यावेळी बोलतांना ट्वेन्टीवन ऑर्गॅनिक लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख, म्हणाल्या, गोल्डक्रेस्ट हाय, वाशी येथील शेतकऱ्यांच्या सेद्रींय उत्पादन विक्रीचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. यानिमित्ताने त्यांच्यामध्ये सेद्रीय उत्पादना बाबत जागरूकता निर्माण झाली. याठिकाणी शेतकरी येऊन त्यांच्या खरेदीदारांशी थेट संवाद साधू शकतात यामूळे त्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळू शकते. येथील ग्राहकांना देखील त्यांच्या गरजेनुसार येथे येऊन उत्पादने खरेदी करता येतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी ट्वेन्टीवन ऑर्गॅनिक लि., माध्यमातून शेतकरी ते थेट ग्राहक सेंद्रिय शेती
उत्पादन विक्री व्यवस्थेची खासदार राजन विचारे व सिडकोचे कार्यकारी संचालक संजय
मुखर्जी यांनी पाहणी करून हा उपक्रम मुंबई शहरात राबवत असल्याबद्दल कौतुक
करून पुढील वाटचालीसाठी संस्थेला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्राचार्य श्रीमती कविता मल्होत्रा म्हणाल्या, हा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमामूळे नवीन शैक्षणिक धोरणा प्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी कौशल्यात भर टाकणारा आहे. विदयार्थ्यामध्ये पर्यावरण साक्षरतासह जीवनउपयोगी कौशल्य विकासीत होतील, निसर्गाच्या अधिक जवळ आणून शेतकऱ्या बाबत त्यांच्या मनात जाणीव निर्माण होईल, असे सांगितले. तर गोल्डक्रेस्ट हाय, वाशी येथील विद्यार्थ्यानी या उपक्रमामुळे आमच्या ज्ञानात भर पडून मराठवाडयातील शेतकऱ्यांनी पिकवलेला सेंद्रीय सकस आणि दर्जेदार शेतमाल, भाजीपाला आदी उत्पादने प्रत्यक्ष पाहता आली याचा आम्हाला आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया दिली.