४०जणांची मोफत तपासणी ;११ जणांवर शस्त्रक्रिया
लातूर ;दि.८ (प्रतिनिधी )
-ममता यूरोलॉजी सेंटरच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन व गोकुळ प्रतिष्ठानच्या वतीने संयुक्त विद्यमाने ममता हॉस्पिटलमध्ये आयोजित मोफत मुत्ररोग चिकित्सा व उपचार शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला .
‘ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद घेऊन लातुरात स्थापन करण्यात आलेल्या ममता हॉस्पिटलमध्ये डॉ. मधुकराव कुलकर्णी , डॉ. सौ.माया कुलकर्णी आणि डॉ.विश्वास कुलकर्णी व डॉ.सौ अनुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालील स्थापन स्टाफने ममत्व भाव जोपासत रुग्णसेवेचा अखंड यज्ञ चालू ठेवला आहे.
डॉ.विश्वास कुलकर्णी यांनी २७ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या
ममता यूरोलॉजी सेंटरच्या वर्धापन दिनी मोफत नेत्र रोग व उपचार शिबिराचे आयोजन केले जाते. २७ वर्षे निरंतर आरोग्यसेवा देणारे ममता यूरोलॉजी सेंटर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सेंटर आहे. लातूर शहरातील प्रसिद्ध सर्जन डॉ. एस. एन.जटाळ यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून या मोफत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .डॉ.विश्वास कुलकर्णी डॉ.अमोल लोंढे यांनी नोंदणी केलेल्या ४० रुग्णांची तपासणी केली आणि त्यांना मोफत औषधे वाटप करून आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच ११ जणांची मोफत शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली . आगामी काही दिवसात या सर्व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.गोकुळ प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ.आर.व्ही.कुलकर्णी यांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या विनामूल्य उपलब्ध करून दिल्या.
यावेळी आपल्या छोटेखानी भाषणात डॉ.सोपानराव जटाळ यांनी ममता हॉस्पिटलच्या अविरत रुग्णसेवेचे कौतुक केले .ते म्हणाले की , डॉ.विश्वास कुलकर्णी यांच्या नावातच विश्वास असल्याने सर्व रुग्ण हे अत्यंत विश्वासाने उपचार करून घेण्यासाठी ममता हॉस्पिटलची निवड करतात मागील २७ वर्षापासून दरवर्षी मोफत मूत्ररोग चिकित्सा व उपचार शिबिरामुळे मानवतेची सेवा करण्याचे पुण्याचे काम होत आहे.
याप्रसंगी डॉ. विश्वास कुलकर्णी ,डॉ. अनुजा कुलकर्णी ,डॉ. अमोल लोंढे ,रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष सतीश कडेल ,सचिव दिनेश सोनी ,अनिल टाकळकर ,सदानंद शेट्टी ,प्रोजेक्ट चेअरमन भावेश गांधी तसेच ममता हॉस्पिटल मधील डॉ.शबाना शेख ,सोमनाथ हुमनाबादे, आरती जोशी यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती .