मन की बात ने निलंगेकरांच्या संकल्पनेला पाठबळ

0
402
पंतप्रधानाच्या ‘मन की बात’ ने निलंगेकर यांच्या संकल्पनेला पाठबळ!
निलंगा प्रतिनिधी ः- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना कोरोनाच्या लसीबाबत असलेले गैरसमज दूर करत लस घेण्याचे आवाहन केले. यावेळी लसीकरण व्हावे यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशीही अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान यांच्या ‘मन की बात’ ने भाजपाचे प्रदेश सचिव अनंत पाटील निलंगेकर यांनी अक्का फाऊंडेशनच्या वतीने लसीकरणासाठी टास्क फोर्सची स्थापना करून नागरीकांचे शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले आहेत. त्यांच्या या संकल्पनेला पंतप्रधानाच्या ‘मन की बात’ ने पाठबळ मिळाल्याने स्पष्ट झाले आहे.
दीड वर्षापासून कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे.या काळात युवा नेते तथा भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नुकतीच निवड झालेले अरविंद पाटील निलंगेकर यांनी गरजवंतांना मदतीसाठी पुढाकार घेतला. अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून अन्नधान्याचे किट वाटप तसेच आवश्यकतेनुसार मदतीचा महायज्ञ त्यांनी सुरू ठेवला.
जानेवारी महिन्यात लसीकरणास प्रारंभ झाला. शासकीय पातळीवरून लसीकरण सुरू असताना त्याबाबत जनजागृतीसाठी अक्का फाऊंडेशनने पुढाकार घेतला.प्रत्यक्षात ज्याठिकाणी लस दिली जात आहे त्या ठिकाणी लसीकरणासाठी येणार्‍या नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम फाउंडेशनने केले.उन्हाळ्याच्या कालावधीत ऊन लागू नये यासाठी मंडप व अनुषंगिक व्यवस्था केली.पिण्याचे पाणी तसेच नागरिकांना येण्या-जाण्यासाठी सोय करण्यात आली. कुठल्या केंद्रावर कोणत्या लसीचे किती डोस उपलब्ध आहेत ? याची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविली. लसीकरणा दरम्यान गोंधळ- गडबड होऊ नये याची काळजी घेतली. गावपातळीवर स्वयंसेवकांची नेमणूक करून लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी प्रयत्न केले.
जानेवारी महिन्यापासून अक्का फाउंडेशन हे कार्य करत आहे.युवा नेते अरविंद पाटील यांची संकल्पना आणि त्यानुसार सुरू असणारे हे कार्य सामान्य नागरिकांसाठी फायद्याचेच ठरले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या ‘मन की बात’ मधून लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करत शंभर टक्के लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांना जे कार्य अपेक्षित आहे ते निलंगेकर यांच्याकडून अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व ज्या अपेक्षा व्यक्त करते त्या व्यक्त होण्यापूर्वीच पूर्ततेच्या दिशेने सुरु असणारी वाटचाल हा काहीसा वेगळाच अनुभव आहे.पक्षाची विचारधारा शरीरात भिनलेली असल्यानंतर असे कार्य होऊ शकते, हे या माध्यमातून सिद्ध झालेले आहे. लसीकरणाच्या संदर्भातील उपक्रमाने निलंगेकर यांच्या दूरदृष्टीचे राज्य पातळीवरून कौतुक होऊ लागले आहे. तसेच पंतप्रधानाच्या ‘मन की बात’ चे निलंगेकरांच्या या संकल्पनेला आता पाठबळ मिळाले असल्याचे स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here