मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा

0
347

मनाच्या श्लोकांचे सामर्थ्य आत्मसात करुनच

जीवन सफल बनविता येईल – सु. ग. स्वामी

सातारा – “मनात जो विचार येतो त्याप्रमाणेच माणसाची कृती होत असते. म्हणूनच जो मनाला जिंकतो त्याला जग जिंकता येते, हे ओळखूनच समर्थ रामदासस्वामींनी मनाला महत्त्व दिले आहे. मन हे मूलतः सज्जन आहे असा विचार करुन समर्थांनी मनाला हा उपदेश केला आहे. या उपदेशाने मनाचे सामर्थ्य वाढून कोरोनाशी लढण्याचे मानसिक बळ मिळेल हे ओळखूनच मनाचे श्लोक पाठांतराची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भविष्यातही मनाच्या श्लोकांचे हे सामर्थ्य आत्मसात करुनच आपणास आपले जीवन सफल बनविता येईल”, असा विश्वास सज्जनगड येथील श्री समर्थ रामदसस्वामी संस्थानचे अध्यक्ष आणि समर्थ घराण्यातील वंशज सु. ग. तथा बाळासाहेब स्वामी यांनी व्यक्त केला.

सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानच्या वतीने समर्थ श्री रामदासस्वामी यांच्या श्री मनाचे श्लोक पाठांतराची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.एक्केचाळीस आठवडे चाललेल्या स्पर्धेत देश विदेशातून अडिच हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि त्यापुढील खुला, अशा चार गटात ही स्पर्धा झाली. २७ सप्टेंबर २०२० ला स्पर्धेला सुरुवात झाली आणि १८ जुलैला २०२१ ला स्पर्धेतील शेवटची फेरी पूर्ण झाली. चोपन्न तज्ज्ञांनी या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम केले. या स्पर्धेच्या समारोप आणि निकाल जाहीर करण्याचा ऑनलाईन कार्यक्रम १५ ऑगस्टला सायंकाळी सज्जनगडावर झाला. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीस बाळासाहेब स्वामी, समर्थ घराण्यातील वंशज भूषण स्वामी यांच्या हस्ते श्री समर्थ प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन झाले. यानंतर ज्येष्ठ कीर्तनकार सोन्ना महाराज रामदासी यांनी स्वागत केले. स्पर्धेचे संयोजक आनंद कुलकर्णी (जयसिंगपूर) यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची पार्श्वभूमी कथन करुन स्पर्धेविषयी माहिती दिली. यानंतर स्पर्धेच्या उत्कृष्ठ संयोजनाबद्दल आनंद कुलकर्णी यांचा संस्थानचे अध्यक्ष सु. ग. स्वामी यांच्या हस्ते श्री समर्थ समाधीवरील शाल, श्रीफळ आणि श्री समर्थ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना समर्थ घराण्यातील वंशज भूषण स्वामी म्हणाले, “कोव्हिडमुळे जशी शरीरे दुर्बल झाली तशी माणसांची मनेही खचली आहेत. अशा स्थितीत मनाला पुन्हा उभारी देण्याची शक्ती फक्त संतांच्या साहित्यातच आहे. मनाचे सामर्थ्य समर्थांनी चारशे वर्षांपूर्वीच ओळखले होते. मनाच्या या सामर्थ्यांची चारशे वर्षांपूर्वी जितकी गरज होती तितकीच आजही आहे. इतकेच नव्हे तर परमार्थ मार्गात साधकांच्या सोबत ख-या अर्थाने जर कुणी असेल तर ते मनाचे श्लोकच आहेत. म्हणूनच या श्लोकांचे जागरण व्हावे आणि त्याचे आचरण व्हावे, या भूमिकेतून संस्थानने ही स्पर्धा घेतली होती”.

यानंतर स्पर्धेचे संयोजक आनंद कुलकर्णी यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. स्पर्धेचा निकाल असा –

१. पहिली ते चौथी गट –

प्रथम क्रमांक,

क्षितिश अविक्षित काळे,चिंचवड, पुणे

द्वितीय क्रमांक(विभागून)

अद्वय श्रीकांत घाटे,वेदांत सचिन पोवार,आर्या विद्याधर गोखले,मुलूंड,कोल्हापूर,कोल्हापूर

तृतीय क्रमांक

तेजस योगेश घैसास,नौपाडा,ठाणे

चतुर्थ क्रमांक

ईशान निखिल नझिरकर,सातारा

पाचवा क्रमांक(विभागून)

पूर्वा राकेश जोशी,नेत्रा सुयोग बेडेकर,दुर्वा दीपक वेंगुर्लेकर,श्रीराज राकेश ओक,सातारा,कल्याण,इस्लामपूर,रत्नागिरी

उत्तेजनार्थ

भार्गवराम श्रीपाद ओगले,प्रांजल रुपेश धारवे,भौमी किरण मोरे,सुधन्वा गिरीश देशपांडे,धनश्री शैलेश सोंडकर,अवनी अमोल देशपांडे वेंगुर्ले,रत्नागिरी,ठाणे,नांदेड,ठाणे,नागपूर

२. पाचवी ते सातवी गट –

प्रथम क्रमांक

मधुरा विशाल पाठक,,पुणे

द्वितीय क्रमांक,(विभागून)

राघव शिरिष व्हरसाळे,चैत्रा राघवेंद्र प्रभुणेऔरंगाबाद,पुणे

तृतीय क्रमांक

(विभागून)

श्रुतिका समीर अभ्यंकर,अदिती अभिजित बर्वे,वेदान्त वैभव काशीकर,नैतिक पियुष करंदीकर,अग्रणी अमित साठे,डोंबिवली,कल्याण,इंदौर,इंदौर,पुणे

चतुर्थ क्रमांक (विभागून)

अथर्व मनोजकुमार कुलकर्णी,अन्वी मंदार घैसास,ध्रुव रोहित धारप,सराह सौरभ काशीकर,रुजुता अभय पाध्ये,अद्वैत देवेंद्रनाथ जोशी,कराड,सांगली,बदलापूर,इंदौर,मालाड,बदलापूर

पाचवा क्रमांक(विभागून) श्रेयस राजन जोशी,

स्वानंद शेखर शिरोळे ,नाशिक,नागपूर

उत्तेजनार्थ

राघव सचिन रिसबूड,प्रवरा गुरुप्रसाद बखले,गीत सागर सहस्त्रबुध्दे,श्रुती विजय बोरवणकर

अमोघ हर्षल चिटणवीस,औरंगाबाद,गोवा,चिंचवड, पुणे,राजापूर ,नागपूर

३. आठवी ते दहावी गट –

प्रथम क्रमांक

हर्षाली अभिजित केळकर ,मालगुंड, रत्नागिरी

द्वितीय क्रमांक

वरदा अतुल फाटक ,चिंचवड, पुणे

तृतीय क्रमांक

सृष्टी राजेश जोशी ,पुणे

चतुर्थ क्रमांक

रोहिणी गजानन वझे,्गोवा

पाचवा क्रमांक

अनिमिष अभिजित आचार्य,नाशिक

उत्तेजनार्थ

इशा राजेश जोशी, सायली जीवन महाडिक,स्वराली महेश गाडगीळ,शुभांगी संजय सोनपेठकर, कुंदन विलास पाटील

औरंगाबाद,कांदिवली,औरंगाबाद ,अंबाजोगाई ,पुणे

४. खुला गट –

प्रथम क्रमांक

अभय दत्त्तात्रय पाध्ये ,मालाड

द्वितीय क्रमांक

डॉ. कश्मिरा जठार,पुणे

तृतीय क्रमांक

वैशाली जितेंद्र भाटे ,पुणे

चतुर्थ क्रमांक

प्रियांका प्रशांत कुंटे,डोंबिवली

पाचवा क्रमांक

वर्षा मंदार जोशी ,सातारा

उत्तेजनार्थ

श्रीराम विठ्ठल कोल्हटकर ,स्वप्निल मधुसूदन गोर्डे ,माधुरी अरविंद नवरे,जान्हवी गणेश गुडसूरकर ,मेधा राहूल डांगे ,पल्लवी कदम ,मधुरा जितेंद्र अभ्यंकर ,गोरेगाव,अमेरिका पुणे

याशिवाय ऑटीझम (स्वमग्नता) या आजाराने पीडित असूनही संपूर्ण स्पर्धा पूर्ण करणा-या पहिली ते चौथी गटातील ताडदेव – मुंबईच्या अर्नेश योगेंद्र मुंडे आणि जन्मजात अंध असूनही सगळ्या नैसर्गिक अडचणींवर मात करीत स्पर्धा पूर्ण करणा-या खुल्या गटातील जानवली – कणकवलीच्या सुगंधा सुभाष माईनकर यांना या स्पर्धेतील श्री समर्थ विशेष गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. शेवटी सोन्ना महाराज रामदासी यांनी कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमासाठी श्री रामदासस्वामी संस्थानचे सर्व सेवेकरी, कर्मचारी, ठिकठिकाणचे श्री समर्थ भक्त, परिक्षक, तंत्रज्ञ, मराठी साहित्य डॉट कॉमचे प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले.

—————————–

Kulkarni’s Signeture.tif

संकलन :आनंद कुलकर्णी

संयोजक, श्री मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा

श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड

संपर्क क्रमांक – 7744964550

सदरचा कार्यक्रम संस्थानच्या You Tube चॅनेलवर व्हिडीओ स्वरुपात उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here