औसा (प्रतिनिधी )– लिंबाला दाऊ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर 20 डिसेंबर रोजी च्या निकालाने बालासाहेब लक्ष्मणराव देशमुख यांची थेट जनतेतून सरपंच पदी निवड झाल्यानंतर दिनांक 6 जानेवारी रोजी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत सौ बबीता भागवत सुरवसे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.लीबाळा गावाच्या विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये राजकीय मतभेद बाजूला सारून संपूर्ण गावाला ग्रामसभेच्या माध्यमातून विश्वासात घेऊन गाव विकासाला चालना देण्यात येईल असे प्रतिपादन नूतन सरपंच बालासाहेब देशमुख यांनी केले.
पुढे बोलताना बालासाहेब देशमुख म्हणाले, महिला मंडळ, महिला बचत गट, युवक मंडळ यांच्या सहकार्याने शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. तसेच शेतकरी ,शेतमजूर ,श्रावणबाळ, विधवा व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल .शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासाठी गोठे ,सिंचन विहिरी ,शेततळे व नाल्यावर बेरेज उभारून शेतीच्या सिंचनाची अद्यावत व्यवस्था करून लिंबाळा गावाला पाणीदार करण्याचा आपला आगामी काळातला संकल्प पूर्णत्वास नेऊ तसेच 1993 च्या भूकंपानंतर गावाच्या लोकसंख्येमध्ये व कुटुंब संखेत वाढ झालेले लक्षात घेऊन रमाई आवास योजना ,वाल्मिकी आवास योजना ,प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या योजनातून बेघरांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. गावातल्या नागरिकांनी आपल्यावर मोठा विश्वास दर्शविला असून ग्रामस्थांच्या विश्वासाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तडा न जाऊ देता निस्वार्थ भावनेने गावाची एक सच्चा सेवक म्हणून आपण सेवा करणार असल्याचे शेवटी बालासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए बी मादळे यांनी उत्कृष्ट काम पाहिले .याप्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष ,तलाठी बिराजदार ग्रामसेवक मिश्रा ,पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे ,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेरमन ॲड वृशाल देशमुख अनेक माजी सरपंच, उपसरपंच ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांच्या वतीने नूतन सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व निवडणुकीत सहकार्य. केलेल्या प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.