निलंगा विधानसभा मतदारसंघाची पायी परिक्रमा करणार-माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर
निलंगा-(प्रतिनिधी)-निलंगा येथे एकदिवशीय कार्यकर्ता अधिवेशनामध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधण्यासाठी व गावात जाऊन त्यांच्या अडीअडचणीची विचारपूस करण्यासाठी केंद्र आणि राज्याच्या योजनेची माहिती व जनजागृती करण्यासाठी आपण आगामी काळात पायी विधानसभा मतदारसंघाची परिक्रमा व पदयात्रा काढणार असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले
पुढे बोलताना ते म्हणाले आपल्या 24 वर्षाच्या राजकीय प्रवासात आपण कोणालाही दुखावले नाही, आपल्या वागणुकीत कसलाही फरक पडला नाही फक्त दाढी पांढरी झाली आहे.
हा प्रवास संघर्ष आणि संयमाचा होता घरातून बाहेर पडलो ही काही प्रॉपर्टीची लढाई नव्हती तर या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी ,शेतमजूर ,महिला गोरगरीब जनतेच्या सन्मानाची लढाई त्यांना सोबत घेऊन चालायचे होते, परंतु डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची भूमिका मोठ्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची होती, त्यामुळे त्यांच्यासोबत राहू शकत नाही, म्हणून आपण वेगळा मार्ग निवडला जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकलो आक्का खासदार झाल्या मी आमदार झालो 24 वर्षानंतर आज माझ्यात काही फरक जाणवला का? असा प्रश्न करून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले 24 वर्षात मतदार संघाचे काम करतो मी एकालाही रागावून बोललो नाही, लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना म्हणाले की योजना शासनाने आत्ता आणली आहे. परंतु अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक माता भगिनीं च्या आरोग्याची मी काळजी घेतो आणि त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या आहेत व भविष्यातही पुरविणार असे अभिवचन उपस्थित माता भगिनींना देऊन ते म्हणाले मंत्री असताना मराठा आरक्षण कमिटीवर सदस्य होतो मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी आग्रही आहे. आणि त्या बाजूने आहे त्या पद्धतीने प्रयत्न केले परंतु ठाकरे सरकारच्या काळात मराठा समाजाची बाजू योग्य पद्धतीने न मांडल्यामुळे आरक्षण गेले, परंतु आमचे सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून म्हणाले जिल्ह्यातील काँग्रेस नेते अमित देशमुख मला म्हणाले लोकसभा इलेक्शनमध्ये आपला विधानसभा मतदारसंघ वीस हजाराने मायनस गेला आत्ता कसे करणार म्हणाले त्यांना उत्तर दिले आपला लातूर विधानसभा मतदारसंघ 2019 मध्ये मायनस होता आपण निवडून आलात तसेच 2019 मध्ये झाले तेच 2024 ला होणार आहे, असे शेवटी माजी पालकमंञी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बोलून दाखवले.