26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार?*

*मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार?*


संजय शिरसाठ , भूमरेसह ३० जणांना मंत्रीपदाची लॉटरी


मुंबई :दि.२१ ( प्रतिनिधी) — राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती मिळत आहे. हा विस्तार उद्या शुक्रवारी होणार असून पहिल्या टप्प्यात एकूण ३० आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडी सरकार पाडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर शिवसेना आमदारांचा गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे उद्या होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे दोन तृतीयांश मंत्री असतील तर उर्वरित मंत्रिपदे शिंदे गटातील आमदारांना मिळतील, असे सांगितलं जात आहे. भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि आशिष शेलार या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असणार आहे.

दुसरीकडे, थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंडखोरी केलेल्या नेत्यांनाही मंत्रिपदाचे बक्षीस मिळणार आहे. यामध्ये उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश असेल, अशी माहिती मिळत आहे.

भाजपकडे महत्वाचे विभाग

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्ताभ्रष्ट करण्यासाठी भाजपने ५० आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र भाजपचे विधानसभेत १०६ आमदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद जरी शिंदे यांच्याकडे असले तरी महत्वाची खाती आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार असल्याचा दावा केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]