भूजल जनजागृती

0
322

 

भूजल पूर्नभरण जनजागृती – लोक चळवळ काळाची गरज”

 

लातूर – प्रतिनिधी : दयानंद कला महाविद्यालय, (भूगोल विभाग) लातूर आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन एक दिवसीय राज्यस्तरीय वेबीनार “भूजल पुर्नभरण आणि लोकसहभाग – गरज लोक चळवळीची या विषयावर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ते पावसाच्या पाण्याचे संकलन, पुर्नभरण आणि ग्रामस्वच्छता” या विषयावर मार्गदर्शन करताना माजी सहसंचालक डॉ. सतीश उमरीकर यांनी समाजामध्ये भूजल पुर्नभरण साक्षरता निर्माण होणे आवश्यक असल्याचे नमुद केले. “अमृताचे खरे नाही, पाण्याला मोल नाही”.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.गायकवाड हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा औरंगाबादचे कार्यकारी अभियंता मनोज सुरडकर, बळीराम केंद्रे, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. भा.ना. संगनवार भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. डि.एस.‍ शिरुरे कार्यक्रमाधिकारी डॉ. महाजन टी.एन., प्रा. यादव एस.सी. व समन्वयक अधिकारी स्नेहा गोसावी आदीची उपस्थिती होती. तसेच दयानंद कला महाविद्यालयातील भूगोल विषयाचे विद्यार्थी -विद्यार्थींनींनी उत्सपुर्तपणे मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम भूजल सर्वेक्षण विभाग पुणे येथील संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व सहसंचालक डॉ. पंचमलाल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. पुढे बोलतांना डॉ. सतीश उमरीकर म्हणाले पाऊस आणि पाणी पतळी यांचा तौलनिक अभ्यास, पाणवढे निर्मिती आणि निगा, काटकसरी वापर, पुन:भरण, पुन:वापर, वैयक्तिक स्वच्छता, शुध्द साठवण, परिसर स्वच्छता या माध्यमातून गावकरी ते राव ना करी हि संकल्पना मांडली. तसेच शाश्वत विकासाची 17 ध्येय सांगून त्यात सहाव्या क्रमांकावरील ‘शुध्द पाणी आणि आरोग्यदायक स्वच्छता’ चे महत्त्व स्पष्ट केले.

यावेळी श्री. मनोज सुरडकर, डॉ. प.ल. साळवे यांनी भूजल पुर्नभरण भविष्याची गरज” या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सुत्रसंचालन आणि आभार समन्वय अधिकारी स्नेहा गोसावी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. महाजन टी.एन. व प्रा. यादव एस.सी. यांनी परिश्रम घेतले.

 

————————————————————————

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here