16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeताज्या बातम्या*भूकंपावरील शोध प्रेझेंटेशनमध्ये प्रसन्न वायचळ यांचा प्रथम क्रमांक*

*भूकंपावरील शोध प्रेझेंटेशनमध्ये प्रसन्न वायचळ यांचा प्रथम क्रमांक*

शिवाजी विद्यापीठात आय सी फास्ट २०२३ परिषद

कोल्हापूर ता.
छत्रपती शिवाजी विद्यापीठात अलीकडेच आय सी फास्ट – २०२३ ही आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली होती. या परिषदेमध्ये श्री. प्रसन्न वायचळ यांनीही त्यांचे भूकंपावरील संशोधन सादर केले होते. त्यांच्या प्रेझेंटेशन ला “उत्कृष्ट” म्हणून प्रथम क्रमांकाचे परितोषिक व रोख रु. ५०००/- देण्यात आले. या परिषदेत जपान आणि भारतातील असे एकूण ३५० च्या वर संशोधक आणि शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.

मोठे भूकंप होण्याआधी साधारण ३-१४ दिवस भूकंपाचे पूर्व संकेत मिळतात आणि प्रसन्न वायचळ यांनी याचा शोध लावून गेली अनेक वर्षे ते भूकंपाचे पूर्वानुमान काढीत आहेत. याचाच एक भाग म्हणून गत वर्षी सन २०२२ मध्ये नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये झालेल्या एसर्स-२०२२ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये असाच एक शोध निबंध त्यांनी सादर केला होता. त्या संशोधनाद्वारे त्यांनी भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये आणि दक्षिण प्रशांत महासागरात आणि न्यूझीलंड येथे एकाच वेळी एकाच प्रक्रियेतून भूकंप होऊ शकतात हे प्रायोगिक निरीक्षणातून दाखवून दिले होते. या परिषदे दरम्यान नांदेड विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक टी. विजय कुमार व निर्देशक डॉ. अविनाश कदम यांनी लातूर – नांदेड- हिंगोली या क्षेत्रात होणार्‍या भूकंपाचे वेध श्री. वायचळ यांना विकसित केलेल्या तंत्रज्ञानाने टिपता येतील का याच्या अभ्यासासाठी बोलविले होते.
एका संंयुक्त पाहणी अभ्यासाद्वारे डिसेंबर-२०२२ ते जानेवारी-२०२३ दरम्यान एक उपकरणांचा संच नांदेड इथे प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आला होता. त्यामध्ये नांदेड परिसरातील कमी क्षमतेचे भूकंप यांची नोंद नांदेड येथे बसविण्यात आलेल्या उपकरणात झाली होते. इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे श्री. वायचळ यांचे मुख्य केंद्र आहे. मात्र दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी नांदेड आणि इचलकरंजी येथील दोन्हीही उपकरणांनी एकाच वेळी भूकंपाचे पूर्वसंकेत टिपले होते. ज्याचे 5.6 क्षमतेचे भूकंप अंदमान आणि निकोबर बेटाजवळ आणि सुमात्रा, इंडोनेशिया येथे २ आणि ३ जानेवारी २०२३ रोजी झाले होते. यावरून अशा भूकंपाचे पूर्वसंकेत साधारण ३-४ दिवस आधीच मिळाले होते.

याच अभ्यासादरम्यान मिळालेल्या माहितीचे विश्लेषण प्रसन्न वायचळ यांनी गेल्या. ८ आणि ९ सप्टेंबर २०२३ रोजी शिवाजी विद्यापीठात झालेल्या परिषदेत सादर केले. भूकंपाचे पूर्वसंकेत हे नैसर्गिकरीत्या प्रत्यक्ष भूकंप होण्याआधी विस्तृत भूभागात म्हणजे शेकडो ते हजारो किलोमीटर दूर पर्यंत टिपता येतात असे या अभ्यासातून सिद्ध केले आहे. अशी उपकरणे अनेक ठिकाणी देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बसविल्यास भूकंपाचा केंद्रबिन्दु अचूकपणे ओळखण्यास मदत होणार आहे. भारतातील लातूर, गुजरात मध्ये भुज अथवा या वर्षी फेब्रुवारी मध्ये झालेले तुर्की सिरिया येथील भूकंप असोत की नुकताच मोरोक्को मधील ६.८ क्षमतेचा भूकंप ऐदि सर्व भूकंपामुळे अतोनात जीवित आणि वित्त हानी होते याची प्रचिती आली आहे. त्या निष्कर्षाला या संशोधांनाला आता आणखीन सबलता आली आहे.
कोल्हापूर येथील परिषदेमध्ये शिगा, जपान येथील प्रा. ओसाकू साकाई यांनी विशेष उत्सुकता दाखविली आहे तसेच जपान, तैवान आणि इंडोनेशिया येथेही अशी संयुक्त अभ्यास मोहीम काढता येईल यासाठीचे प्रयत्न ते करणार आहेत. त्यासाठी जपान येथेही येण्यास सहकार्य करण्यास श्री. वायचळ यांनी तयारी दाखविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]