क्रिकेटची पंढरी म्हणून ऒळखल्या जाणार
लाॅर्डसवर भारतीय संघाचा शानदार विजय.
लॉर्ड्स वर तिरंगा फडकला !!
-कोण म्हटलं भारताच्या बॅट्समन ला भारताच्या बाहेर खेळता येत नाही ?
के एल राहुल पाहिला ???– कोण म्हटलं होल्डिंग , मार्शल , गार्नर . रॉबर्ट्स असे चार चार वेगवान गोलंदाज भारतात एका वेळी होऊ शकणार नाहीत .. बुमराह , शमी , ईशान शर्मा आणि सिराज बघितले ?
– कोण म्हटलं भारताची टीम एखाद दोन प्लेयर वर अवलंबून असते ?
आधी रोहित शर्मा आणि राहुल आणि नंतर पुजारा, राहणे पाहिले ?– कोण म्हटलं एकदा ७ विकेट गेल्या कि कोणालाही बॅट धरता येत नाही ?
शमी आणि बुमराह ला बघितलं ?– कोण म्हटलं आपण आयत्या वेळेला कच खातो ?
सिराज पाहिला ?– कोण म्हटलं आपण दडपण घेतो ?
आपली टीम पाहिली ?भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी एक अनोखी भेट देणाऱ्या या संघाचे मनापासून अभिनंदन .. कोहलीच्या डोळ्यातली आग त्याच्या बॅटिंग मध्ये पुढच्या मॅच मध्ये येईलच कारण तो किंग कोहली आहे .. !!
सिराज च्या डोळ्यांत ” दिवार ” मधला बच्चन दिसला
बुमराह पहिल्यांदाच चिडलेला पाहिला आणि त्याने इंग्लंड चा बॅट आणि बॉल दोन्ही बाबतीत धुव्वा उडवला ..
..ऑलिंपिक मधल्या उत्तम खेळानंतर क्रिकेट मध्ये पण असा विजय मिळवून भारतीय खेळाडूंनी क्रीडाप्रेमींची दुवा घेतली आहे .. !!
जयहिंद !!