लातूर- सौ प्राजक्ता प्रवीण सरदेशमुख यांचे वडील श्री भानुदासराव कुलकर्णी, उदगीर यांचे वृध्दापकाळाने आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) रोजी वयाच्या 85 व्या वर्षी पुणे येथे दु:खद निधन झाले .आषाढी एकादशीला त्यांना वैकुंठवास होणे ही ईश्वरइच्छा.
त्यांच्या मागे त्यांची पत्नी, 2 मुलं – सुना, 2 मुली- जावई आणि नातवंड असा मोठा परिवार आहे.
ते राज्य कृषी खात्यामध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. सेवा निवृत्ती नंतर उदगीर येथे अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग होता. उदगीर येथील राम मंदिराची उभारणी व चिन्मय मिशन च्या माध्यमातून गीता अभ्यास वर्ग चालवत असत. लातूर विभागात चिन्मय मिशन च्या पहिल्या कार्यालयाची उभारणी उदगीर येथे त्यांच्या पुढाकाराने झाली.
त्याच्या आत्म्याला सद्गती मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
- सौ प्राजक्ता प्रवीण सरदेशमुख
(9423776234)