लातूर/प्रतिनिधी:
युवा नेते शंकरभैय्या शृंगारे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा संघटन सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
युवा नेते शंकरभैय्या शृंगारे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.तरुणांचे संघटन आणि सामाजिक समस्या सोडविण्यासाठी ते सतत अग्रेसर राहिलेले आहेत.याच कामाची दखल घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड.ज्ञानेश्वर चेवले यांनी युवा मोर्चाच्या जिल्हा संघटन सरचिटणीस पदी त्यांची निवड केली आहे.
माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निर्देशानुसार तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.
रमेशअप्पा कराड,प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शना खाली ॲड.चेवले यांनी ही निवड केली आहे. यावेळी प्रदेश प्रवक्ता प्रेरणा होनराव भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस तानाजी बिराजदार यांची उपस्थिती होती संघटन सरचिटणीस पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांचे संघटन वाढवावे,तरुणांना पक्षाच्या विचारधारेशी जोडून घेण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पार पाडू.नेत्यांनी ज्या विश्वासाने आपल्यावर जबाबदारी सोपवली त्याच विश्वासाने पक्ष कार्यात सक्रिय राहू,अशी प्रतिक्रिया शंकरभैय्या शृंगारे यांनी व्यक्त केली.भाजयुमोच्या जिल्हा संघटन सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल युवा नेते शंकरभैय्या शृंगारे यांच्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.