पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला आठ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण
लातूर दि. ११– जगातील लोकप्रिय नेते माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून आठ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा विकासरथ बाईक रॅलीचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते शनिवार रोजी सकाळी १० वाजता रेणापूर येथील श्री रेणुकादेवी मंदिर परिसरात करण्यात आला.

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा केंद्र शासनाने नुकतीच आठ वर्षे पुर्ण केली या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित विकासरथ बाईक रॅली संपूर्ण लातूर जिल्ह्यात जाणार असून आ. रमेशअप्पा कराड यांनी झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला व स्वतः या रॅलीत सहभागी झाले. तत्पूर्वी रेणापूर येथील आदिशक्ति श्री रेणुका मातेची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, भाजयुमोच्या प्रदेश प्रवक्ता प्रा. प्रेरणा होनराव, जिल्हाध्यक्ष अँड. ज्ञानेश्वर चेवले, सरचिटणीस तानाजी बिराजदार, भाजपाचे युवा नेते ऋषिकेश कराड, भाजपा लातूर ग्रामीण विधानसभेचे अध्यक्ष अनिल भिसे, तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

सबका साथ, सबका विश्वास, सबाका विकास आणि सबका प्रयास या उक्तीनुसार पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशभरातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी घरकुल, उज्वला गॅस, शेतकरी सन्मान, आयुष्यमान भारत, अटल पेंशन, मोफत राशन, किसान क्रिडीट कार्ड, मुद्रा लोन यासह अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. या योजनेचा लाखो नव्हे तर करोडो गरजू देशवाशीयांना लाभ मिळाला. या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा भाजयुमोच्या वतीने विकासरथ ही बाईक रॅली काढण्यात आली असून संपुर्ण जिल्हाभर या रॅलीचा प्रवास होणार आहे.

मोठ्या उत्साहाच्या वातावरणात रेणापूर येथून सुरू झालेल्या या बाईक रॅलीत भाजपाचे अनेक कार्यकर्ते आपल्या बाईकला पक्षाचा ध्वज लावून सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, यासह विविध गगनभेदी घोषणा देण्यात येत होत्या.

ही रॅली रेणापूर पिंपळफाटा- खरोळा- आष्टामोड मार्गे चाकूर तालुक्यात रवाना झाली. या रॅलीत भारतीय जनता पार्टीचे आनंत चव्हाण, वसंत करमुडे, सतीश आंबेकर, सुरेंद्र गोडभरले, रमाकांत फुलारी, दत्ता सरवदे, विजय चव्हाण, अजित गायकवाड, दिनकर राठोड, राज जाधव, उज्वल कांबळे, कृष्णा मोटेगावकर, कुलभूषण संपते, भाऊसाहेब गुळबिले, दिलीप चव्हाण, श्रीमंत नागरगोजे, मारुती गालफाडे, महेश गाडे, राजू आलापुरे, आंतराम चव्हाण, लखन आवळे, शेख जलील, चंद्रकांत कातळे, अनुसया फड, शीला आचार्य, धनंजय म्हेत्रे, नरसिंग येलगटे, नंदकुमार वल्लमपल्ले, सुभाष वाघ, बाबासाहेब जोगदंड, शालीक गोडभरले, किशन शिरसागर, हनुमंत राऊतराव, विकास सरवदे, भीमराव मुंडे, शंकर राठोड, दिलीप यादव, राजू मानमोडे, हनुमंत भालेराव, लक्ष्मण खलंग्रे, नारायण राठोड, भागवत गीते, सुरेश बुडडे, राजकुमार मानमोडे, प्रल्हाद फुलारी, रवी गोडभरले, खलिल ताशेवाले, रानबा मुळे, पाटलोबा मुंडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांसह तरुणांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग घेतला होता.