लातूर दि.२८ :- लातूर ग्रामीण मधील भाजपाचे युवा नेते ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नुकतीच नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून अनेकांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून भाजपाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेऊन कार्यरत असणारे युवा नेते ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांचा युवकासोबत मोठा जनसंपर्क आहे. संघटन कौशल्य, कर्तुत्व आणि वकृत्व असल्याने सामाजिक, राजकीय, धार्मीक व इतर कार्यातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भारतीय जनता पार्टीत आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी ऋषिकेश कराड यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली आहे.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील तरुणांसोबत काम करणारे त्यांच्या सुखदुखात सहभागी होणारे युवा नेते ऋषिकेश कराड यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याने तरुणांत मोठा उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऋषिकेश कराड यांच्या माध्यमातून लातूर ग्रामीणसह जिल्हाभरातील भाजयुमोच्या पक्ष कार्याला निश्चितपणे बळकटी मिळेल असा अनेकांनी विश्वास व्यक्त केला असून या निवडीबद्दल ऋषिकेश कराड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी दुरध्वनीवरुन अभिनंदन केले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याने भाजपाचे विक्रमकाका शिंदे, भागवत सोट, अमोल निडवदे, महेंद्र गोडभरले, अनिल भिसे, अँड. दशरथ सरवदे, बन्सी भिसे, अभिषेक आकनगिरे, सतीश आंबेकर, हनुमंतबापू नागटिळक, सुरज शिंदे, साहेबराव मुळे, अनंत चव्हाण, पद्माकर चिंचोलकर, वसंत करमुडे, वैभव सापसोड, भैरवनाथ पिसाळ, सुधाकर गवळी, चंद्रकांत कातळे, गोविंद नरहरे, शाम वाघमारे, संभाजी वायाळ, प्रताप पाटील, गंगासिंह कदम, ललिता कांबळे, शिला आचार्य, सुरेखा पुरी, लता भोसले, पांडूरंग बालवाड, श्रीकृष्ण मोटेगावकर, दिपक वांगसकर, आदीनाथ मुळे, गोपाळ पाटील, अशोक सावंत, राजकिरण साठे, सुकेश भंडारे, अमर चव्हाण, संजय ठाकूर, शरद दरेकर, अनंत कणसे, ज्ञानोबा भिसे, श्रीकृष्ण पवार, नरसिंग येलगटे, अच्युत कातळे, रवी माकुडे, दत्ता सरवदे, गणेश तूरुप, मारुती शिंदे, लक्ष्मण नागिमे, गोपाळ शेंडगे, रमाकांत फुलारी, उत्तम चव्हाण, राजू आलापुरे अच्युत भोसले, श्रीकृष्ण जाधव, विजय चव्हाण, अक्षय भोसले, माधव घुले, रमेश कटके, गणेश माळेगावकर, जलील शेख, प्रशांत शिंदे, रमेश चव्हाण, अच्युत भोसले, शुभम खोसे, कार्तीक गंभिरे, वैजनाथ हराळे, राम बंडापल्ले, समाधान कदम, सुखदेव बरडे, ईश्वर बुलबूले, ज्ञानेश्वर जूगल, रमेश लहाडे, सचिन लटपटे, किशोर घुटे, अल्ताफ शेख, हणमंत कापरे, नागराज रिंगणकर यांच्यासह अनेकांनी फेटा बांधून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.