भाजपायुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे ऋणानुबंध वृद्धिगत करण्यासाठी आ.संभाजीरावांच्या उपस्थितीत रंगला डब्बापार्टीचा सोहळा
भाजयुमोचा अभिनव उपक्रम – राजकारणातील आव्हाने, पक्षसंघटन अन् वाटचालीवर झाले विचारमंथन..
लातूर दि.01 मार्च 2022
भाजयुमोच्या कार्यकारीणीची निवड होऊन दोन वर्षे झाले तेव्हापासून भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा कमिटीने अनेक सामाजिक उपक्रम राबवत कोरोना काळातही अनेक रुग्णांना आधार देण्याचे काम केले. याची प्रचिती राज्याला आली. परंतू सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या या टिमला आनंद व्दिगुणित करायला वेळच मिळालेला नाही.त्यामुळे लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व खासदार सुधाकर शृंगारे यांच्या उपस्थितीत व भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून ऐन महाशिवरात्री दिवशी वैचारिक देवाणघेवानीसाठी शेकडो भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अनोखा डब्बा पार्टीचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम पक्षातील ऋणानुबंध, पक्षसंघटन व वैचारीक विचारमंथनासाठी प्रेरणादायी ठरलेला आहे.
बऱ्याच दिवसापासून भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा घ्यावा अशी इच्छा भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांना मनोमन वाटत होती. त्यांनी याबाबत राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे व मनपा सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे यांच्याशी चर्चाही केली परंतु हा संकल्प मूर्तरुपात आणण्याचे काम भाजयुमोच्या टीमने केले. महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी अँड. गणेश गोजमगुंडे यांच्या शेतावर निसर्गाच्या सानिध्यात डब्बा पार्टीचा उपक्रम राबविला. भाजयुमो शहर जिल्हा कार्यकारिणी, विवीध मंडळ व विविध आघाड्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डब्बा पार्टीचा अनोखा कार्यक्रम रंगला. एकमेकांच्या डब्ब्यातील फराळाचे विवीध पदार्थाचा आस्वाद घेत राज्याचे माजी कामगार कल्याणमंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पक्षाचे जिल्ह्यातील काम युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या माध्यमातून वाढलेले संघटन, त्यांची राजकीय वाटचाल व येणाऱ्या काळात महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती व विधानसभेच्या निवडणुकीला पक्ष नेतृत्वाच्या माध्यमातून आपण कसे सामोरे जावे तसेच निवडणूका दरम्यान येणाऱ्या यश अपयशाला सामोरे जात पक्ष वाढीसाठी कसे सामोरे जावे, राजकारण करत असताना कार्यकर्ते व कुटुंबासोबत कसे राहावे याचे धडेही त्यांनी अनुभवातून सांगितले. याबरोबरच भाजयुमोची यशस्वी वाटचाल सुरू असताना पक्षाकडून आपली काय अपेक्षा आहे तेही वदवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. आशा या डब्बा पार्टीच्या उपक्रमामुळे भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांतील आनंद मात्र द्विगुणीत झाला.
या उपक्रमामुळे तरूणांना ऊर्जा मिळाली असून येणाऱ्या राजकिय वाटचालीमध्ये युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वाढीसाठी भाजपायुमोची टिम सक्रियपणे योगदान देतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. देशात एक नंबर असलेल्या पक्षांच्या माध्यमातून राबविलेला व एकतेचा संदेश देणारा उपक्रम इतर जिल्ह्यांतील भाजपायुमोसाठी प्रेरणा देणार आहे.