संजय गांधी निराधार योजनेचे नाव बदलून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे निराधार योजना ठेवावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रा सुधीर पोतदार यांनी केली
22 जानेवारी 2024 रोजी श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे उद्घाटन व श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेसाठी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात यावी…
लातूर ; (प्रतिनिधी )-आज दिनांक 08-01- 2024 रोजी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा लातूर ग्रामीणच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे ओबीसी मोर्चा च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मागण्यांमध्ये दिनांक
1) 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या अयोध्ये येथील श्री प्रभू रामचंद्र मंदिरांच्या उद्घाटन व श्री राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून या सोहळ्यास शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी यांना शाळेला सुट्टी देण्यात यावी त्यांनी हा सोहळा अनुभवता यावे व उत्साहात सहभागी व्हावे म्हणून निवेदन देण्यात आले.
2) ओबीसी समाजाच्या घटनात्मक अधिकारांना संरक्षण द्यावे, मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे कारण ओबीसी समाजामध्ये सुरुवातीपासून 350 पेक्षा अधिक जातींचा समावेश असल्याने सध्या परिस्थितीत ओबीसी मध्येच असणाऱ्या समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याने नवीन कोणत्याही जातीचा समावेश करण्यापूर्वी त्या जातीची आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय मागासलेपण यांचे व्यवस्थित नोंदणी तपासावे शिवाय गावागावात लावण्यात आलेले गाव बंदीचे फलक दूर करण्यात यावेत, गाव हे कुण्या एका जातीचे नसून सर्वधर्म गावामध्ये राहतात त्यामुळे इतर समाजावर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी.
3) संजय गांधी निराधार योजने चे नाव बदलून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे निराधार योजना ठेवावी कारण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात निराधार वंचित आर्थिक दृष्ट्या मागास समाजासाठी कार्य केलेल आहे त्यामुळे ही योजना त्यांच्या नावाने सुरू व्हावी.. यामुळे त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव गोरगरीब, वंचित व सर्वसामान्य समाजाला कायम राहील.
4) प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये ओबीसीच्या सर्व जाती धर्मांचा समावेश करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, शिवाय महाराष्ट्रात वास्तव्यास असणारा धनगर समाज व गुरव समाजास यामध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे, विश्वकर्मा योजनेत ज्या नावांचा समावेश होणार आहे त्यांची काटेकोर तपासणी करण्यात यावी व गरजू तसेच वंचित शिल्पकारास याच स्थान देण्यात यावे यासाठी ही निवेदन देण्यात आले, यावेळी ओबीसीचे भाजपा नेते लातूर ग्रामीणचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुधीर शंकरराव पोतदार यांच्यावतीने ते निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देण्यासाठी ओबीसी समाजातील प्रत्येक तालुक्यातून भाजपाचे ज्येष्ठ नेते आले होते यात श्री धर्मपाल नादरगे श्री महेश बिलापट्टे, सोबत जेष्ठ पत्रकार राम कांबळे, अशोक व्यंकट शेळके, पांडुरंग सूर्यवंशी,दिगंबर घोडके, संदेश खटके, लक्ष्मण नागिमे, संजय कासले, बालाजी सूर्यवंशी, नामदेव काळे, विठ्ठल कसपटे, दत्ताभाऊ खंदाडे ,विजय माने ,प्रकाश पाटील, लक्ष्मण दूधभाते,लक्ष्मण जाधव, गोपीनाथ सगर ,ॲड नितीन म्हेत्रे, अमित बोळेगावकर, अण्णाराव सूर्यवंशी, बालाजी झुंजुरे ,आदिनाथ मुळे, जब्बार करपुडे, नागनाथ गीते, महत्रे गोविंद, मनसुरे रमेश, सोमनाथ लुल्ले, आदिनाथ मुळे, पांडुरंग गडदे, देवानंद वाघलगावे, लिंबराज थोरमोठे, ओम प्रकाश कुंभार, डॉ. शुभम राजेगावें, पांडुरंग गडदे, महिला आघाडीच्या प्रमुख सौ शशिकलाताई, दूधभाते, बाबुराव चामे, सोमन फुलमट्टे, विठ्ठल सारोळे व ओबीसी समाजातील ज्येष्ठ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.