पर्यटनाला जावे तसे काँग्रेसचे आमदार मतदारसंघात येतात
त्यामुळे त्यांना जनतेचे प्रश्न, अडीअडचणी कशा समजणार
बोरी ते बिंदगीहाळ रस्ता दिवाळीपर्यंत मंजूर करुन घेणार-आ. रमेशआप्पा कराड
लातूर दि.०९-( माध्यम वृत्तसेवा)—ज्यांचे कर्तव्य आहे त्यांनी दुर्लक्ष केले असले तरी लातूर तालुक्यातील मौजे बोरी – सलगरा – बोकनगाव – बिंदगीहाळ दरम्यानच्या दुरावस्था झालेल्या रस्त्याच्या कामाला दिवाळीपर्यंत मंजुरी मिळून घेईन अशी ग्वाही देवून लातूर ग्रामीण मधून निवडून गेलेले काँग्रेसचे आमदार पर्यटनाला जावे तसे मुंबईहून बॅग घेऊन मतदार संघात येतात त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न आणि अडीअडचणी कशा समजणार असे भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावात वाडी वस्तीत जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करावी, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे, शक्य असलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा यासाठी भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी सुरू केलेल्या संवाद अभियानास सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असून रविवारी सलगरा, बिंदगीहाळ, बोकनगाव, भाडगाव आणि ममदापूर येथील कार्यक्रमास महिला, पुरुषांसह सर्व स्तरातील नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी आ. कराड यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना अपेक्षित उत्तरे दिल्याने उपस्थितातून समाधान व्यक्त केले जात होते.
संवाद दौऱ्यात आ. कराड यांच्या समवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, संगायो समिती अध्यक्ष वैभव सापसोड, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष संजय ठाकूर भाजपाचे प्रताप पाटील, विजय मलवाडे, पांडुरंग बालवाड, उमेश बेद्रे, राम बंडापल्ले, मारुती शिंदे, सुरेश पाटील, रुपेश काळे, हनुमंत गव्हाणे, आदिनाथ मुळे, लिंबराज बोळंगे, चंद्रकांत पासमे, सचिन साबदे यांच्यासह अनेक जण होते. त्या त्या गावात विविध विकास कामाचा लोकापर्ण आणि शुभारंभ आ. कराड यांच्या हस्ते करण्यात आला.
ठिकठीकाणच्या संवाद कार्यक्रमात बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन अनेक योजना सुरू केल्या या योजनेचा लाभ देताना जात धर्म पाहिला नाही जो पात्र आहे ज्याला गरज आहे अशा लाभार्थ्यांना कसलाही वशिला न लावता विविध योजनेचा लाभ मिळत आहे मात्र काँग्रेसच्या काळात गरिबांना नव्हे तर बागायतदारांना योजना मिळत होत्या राज्यातील महायुती शासन देणारे शासन आहे आणि मागील काळातील महाविकास आघाडीचे शासन वसुली करणारे होते त्यांच्या अनेक मंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले हे कोणीही विसरु शकत नाही.
विलासराव देशमुख यांच्याकडे दूरदृष्टी होती आम्ही त्यांना मानत होतो मात्र त्यानंतरची पिढी माणुसकीची नाही. मांजराच्या माध्यमातून उसाच्या टिपराचे राजकारण करीत आहेत. मशीनने तोडणी केलेल्या उसातून पाचटाच्या वजनाचे बिल द्यायचेच होते तर कपातच का केले ? तोडणी पाप, वजनात पाप आणि भावातही पाप करून शेतकऱ्याची अडवणूक आणि पिळवणूक करणे हे विलासराव साहेबांचं कुठलं स्वप्न आहे. एफआरपी बंधन केल्यापासून कारखान्याचा साखर उतारा का कमी येऊ लागला असाही प्रश्न उपस्थित करून शेतकरी तोच आहे, त्याची जमीनही तीच आहे, ऊसही तोच आहे मग फरक कशात पडला पाण्यात की साखरेत असेही आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखवले
शेतकऱ्यांचे विज बिल माफ केले, लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिलांना वंचित राहणार नाही असे सांगून ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना बोरी सलगरा बोकनगाव बिंदगीहाळ या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून घेऊ, भाडगाव येथे महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याचे समाधान व्यक्त करुन गावातील अवैध्य दारु विक्री बंद करावी. जिल्हा बॅक लाडकी बहीण योजनेतून पैसे कपात करत असल्याची तक्रार केली असता आ. रमेशअप्पा कराड यांनी जिल्हा बॅकेच्या कार्यकारी संचालकास फोन लावून शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योनजेतून एकाही महिलेचा एक रुपयाही कपात करु नये अशी सुचना केली तर पोलीस अधिकाऱ्यांना दारुबंदी बाबत कडक कार्यवाही करावी अशा सुचना केल्या. सलगरा, ममदापूर येथील संवाद कार्यक्रमात निराधार योजनेच्या पगारी वेळेवर होत नाही असे काहींनी बोलून दाखविले तेव्हा राज्य शासनाकडून दर तीन महिन्याला पगारीचे पैसे जिल्हा बॅकेकडे दिले जातात मात्र जिल्हा बॅक जाणीवपुर्वक गोरगरीबांची अडवणूक करुन त्या पैशाचे व्याज खात आहे. या बॅकेचे अध्यक्ष निवडूण गेलेले कॉग्रेसचे आमदार आहेत हेच दुर्दैव आहे. बोकणगाव येथील खंडोबा मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी तीर्थक्षेत्र योजनेचा प्रस्ताव दाखल करा ‘ब’ दर्जा मिळून देऊ, असेही त्यांनी बोलून दाखवले.
सर्वच गावात ग्रामस्थांनी आ. कराड यांचे वाजत गाजत जंगी स्वागत केले. या संवाद कार्यक्रमास सलगरा येथे माजी चेअरमन अण्णाभाऊ हिपळणारे, उपसरपंच स्वरूप साळुंखे, संजय सावंत मधुकर गव्हाणे, खंडेराव पाटील, धीरज सपाटे, आकाश पवार, सोपान नरवटे, सदाशिव हिपळणारे, बिंदगीहाळ येथे सरपंच पूनम कांबळे, मोहनराव शिंदे, गणेश कांबळे, रमेश शेंडगे, आत्माराम शिंदे, राम शेंडगे, नरसिंग भोसले, शरद सावंत, बोकनगाव येथे सरपंच सुरेखा स्वामी, चेअरमन अजय शिंदे, आत्माराम जाधव, गणेश बेंबडे गंगाधर जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष पंडित दाताळ, माजी सरपंच प्रेमलता दाताळ, संध्या दाताळ, राजाराम शिंदे, गोविंद शिंदे, भालचंद्र दातार लक्ष्मण शिंदे भरत दाताळ, अजिराव पाटील, ममदापूर येथे अमोल शेळके, सचिन पासमे, पदमाकर शिंदे, उध्दव गुरमे, ओम पासमे, ज्ञानोबा शेळके, मारोती ढोरमारे, निवृत्ती पासमे भाडगाव येथील कार्यक्रमास व्यंकट मोरे, अभिमन्यु डोपे, रमाकांत बसपुरे, दत्ता मोरे, किशनराव डोपे, शिवाजीराव मोरे, बब्रूवान सिंदाळकर, चांगदेव डोपे यांच्यासह महिला, पुरुष, तरुण मोठया संख्येने उपस्थित होते.