लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील भाग्यश्री सूर्यकांत सुडे
यांच्या अमानुष खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची
स्थगन प्रस्तावाव्दारे सभागृहात मागणी
लातुर प्रतिनिधी : दि. १ जूलै २०२४ -लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील कन्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे ही पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती, ३० मार्च २०२४ रोजी तिचे पुणे येथून अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. या अमानुष खुनाचा खटला चालविण्यासाठी फास्टट्रॅक कोर्ट स्थापन व्हावे, सदरील फास्टट्रॅक कोर्ट लातूर येथे चालवून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी महारा्ष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळीअधिवेशनादरम्यान स्थगन प्रस्तावाव्दारे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. या संदर्भाने सभागृह अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी या मागणीची शासनाने तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत.
मुंबई येथे महारा्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात माजी मंत्री आमदार आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार १ जूलै रोजी स्थगनप्रस्ताव मांडून लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील सूर्यकांत सुडे हे आपले सहकारी असून आपल्या सोबत संस्थेत कार्यरत आहेत. त्यांची कन्या भाग्यश्री सुडे ही पुणे येथे अभियांत्रीकीचे शिक्षण घेत होती तिचे अपहरण करून तिचा निर्घृण खून करण्यात आला आहे. यातून राज्यातील महीलाच्या सुरक्षीततेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे असे सांगीतले.
यावेळी सभागृहात बोलतांना पुढे बोलतांना आमदार देशमुख म्हणाले, लातूर येथील सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यासह यलम समाज बांधवाची अशी मागणी आहे की, या अमानुष खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दि. १२ एप्रिल २०२४ रोजी लातूरकरांनी लातूर शहरात मोर्चा काढला होता. राज्यात पुन्हा अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून राज्य शासनाने खबरदारी घ्यावी, भाग्यश्री सुडेचा अपहरण व खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, सदरील फास्टट्रॅक कोर्ट लातूरात चालावावे अशी मागणी केली. या प्रस्तावाची दखल घेऊन यावेळी सभागृह अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी सरकारने गाभीर्याने विचार करुन तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश शासनाला दिले आहेत.
—