जयंती विशेष
कुंडलपुर नामक गावात माता त्रिशला व पिताने सिद्धार्थ यांच्या कुशीत वर्धमानजी जन्म घेतला ऐश्वर्यसंपन्न पण धार्मिक अशा कुटुंबात जन्म झालेल्या ‘वर्धमान’ वर माता-पिताने उत्कृष्ट संस्कार केले. यौवनात विवाहबद्ध झाल्यावर त्यांना प्रियदर्शिनी ही पुत्री प्राप्त झली. परंतु वर्धमानचे प्रपंचात त्यांचे मन रमले नाही. आपला देह हा नाशवंत असून आत्मा शाश्वत आहे व या आत्म्याचा कल्याणासाठी त्यानी संसारिक सर्व भोग विलासाचा त्याग करून वैराग्य धारण केले. कठोर साधना केली, तपस्या केली. आत्मकल्याणासाठी त्यांनी समता, त्याग, तपश्चर्या, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चरित्र्याचा अंगीकार केला व जगाला अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद चा(3A) दिव्य संदेश दिला.
भगवान महावीरांनी प्रत्येक प्राणीमात्रांवर व वनस्पती जीव आहे, असे सांगितले सव्वे जीवन वी इच्छान्ति जीवीड न मरिज्जिड अर्थात सर्व जीव जगण्याची इच्छा ठेवतात. मृत्यू सर्वांना अप्रिय आहे. असे अहिंसेचे सूक्ष्म व सर्वांगीण विवेचन भ. महावीरांनी केले ‘अहिंसा परमो धर्म’ हा मंगलमय धर्म असून हा धर्माचा आपल्याला तारत असतो.
‘ सुख दिले तर सुख मिळेल
दुःख दिले तर दुःख मिळेल’
असे भ. महावीरांनी सांगितले संग्रह वृत्तीमुळे सामाजिक विषमता निर्माण होते. श्रीमंती- गरीब असा भेद निर्माण होतो.अर्थप्राप्तीसाठी अनेक कुकृत्य करून व्यक्ती अनर्थ घडवत असतो. प्रत्येक जण अपरिग्रहचे तत्व अंगीकारल्यास दुःखदारिद्र्य राहणार नाही ‘अति सर्वत्र वर्ज्यते’ प्रत्येक गोष्टीत मर्यादा ठेवा. आवश्यक तेवढेच संग्रह करा अतिसंग्रह केल्यास मनुष्य दुःखी होतो, असे भ.महावीराने सांगितले.
प्रत्येक पदार्थात अनंत गुणधर्म सामावलेले असतात परंतु आपण जो गुणधर्म विशेष रूपाने आहे. तेवढेच पाहतो प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे व नंतर त्याविषय निश्चित मन बनविणे हा ‘अनेकांतवाद’ चा सिद्धांत आहे. याचे पालन न केल्यास सुख-शांतीचे वातावरण निर्माण होईल.
आपलेच मत म्हणजेच माझे खरे हा दृष्टिकोन न ठेवता इतरांचे मत विचारात घ्यावे. एकाच बाजूने विचार न करता सर्व बाजूने विचार केल्यास कलह टळू शकतो. अनेकांतवाद गुणधर्म आहे. पंचमकालच्या या बिकट परिस्थितीत अहिंसा, अनेकांतवाद,अपरिग्रह भगवान महावीरांचे संदेश त्रिवेणी गंगाजलप्रमाणे आहे. दया, क्षमा, शांती, करूणा धारण केल्यास पृथ्वीतलावर ‘रामराज्य’ पुन्हा अवतरेल यात शंका नाही. ‘मनुष्य जन्म से नही कर्म से महान होता है’ भ महावीराने कर्मसिद्धांत वर भर दिला पापपुण्य आपल्या कर्मावर असते.
आपल्या चांगल्या वाईट कर्मानेचआपणास ८४ लक्ष योनीमधील एक योनी प्राप्त होते असते. तेव्हा चांगले कर्म करा, अशी शिकवण भ.महावीरांनी दिली भ. महावीर सिद्धपुरुष होते व आपण सिद्धाचे वंशज आहोत. भ महावीरांनी माझे अनुयायी व्हा असे प्रवृत्त केले नाही उलट त्याने कोणीही महावीर होऊ शकतो, असे सांगितले
भगवान महावीरांच्या कानात खिळे ठोकले गेले,चंडकोशीक सापाने त्यांच्या पायावर डंख मारला. संगमदेवाने एका रात्रीतून त्यांना 20 उपसर्ग दिले. तरीही ते क्षमाचे रूप धारण करून तटस्थ राहिले. प्रतिशोधाची भावना त्यांना मनात ठेवली नाही.
‘मेति मे सुव्व भुएसू
वेरं मज्झन न केनई’
अर्थात माझे सर्व प्राणीमातत्रांवर प्रेम आहे .माझे कोणाशीही वैरभाव नाही, असे महावीरांनी सांगितले. भ.महावीरांनी 2500 वर्षापूर्वी पाण्याच्या प्रत्येक थेंबात जीव आहे. वनस्पती, वायू ,अग्नि यात प्राण आहे. संवेदना आहे.त्यांचे रक्षण करा त्याचे हनन करू नका. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा. वनस्पतीचा जोपासना करा, असे केल्याने जग प्रदूषण मुक्त होईल व जगातील संकटे नष्ट होतील हे सांगतील, हे सत्य समजण्यास विज्ञानाला 2500 वर्षे लागली.
भगवान महावीरांच्या प्रत्यक शिकवण व कृतीला वैज्ञानिक आधार आहे. ते महान वैज्ञानिक होते. ‘जगा आणि जगू द्या’ असे संदेश भ. महावीराने समस्त मानवजातीला दिला. त्यांची शिकवण एका विशिष्ट धर्मसमुदायापर्यंत संकुचित नव्हती, ती सर्वसमावेशक व सर्वव्यापक होती. आजच्या या असुरक्षित, भोगवादाच्या युगात भ.महावीरांची शिकवण ही काळाची गरज म्हणून म्हणतात. ‘वर्तमान को वर्धमान की आवश्यकता है’ साडेबारा वर्षांची कठोर खडतर साधना केल्यानंतर त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले.
‘संसार के हर जीव में महावीर बसा है
दु:ख दो न किसी को ये उन्हीने कहाँ है’
आज जगावर कोरोना वर जे संकट कोसळले आहे त्याला अनेक कारणापैकी एक निसर्गाचा असमतोल आहे. वृक्षतोड व पशुहत्याचे प्रमाण वाढल्यामुळे पर्यावरणाचा व्हास आहे. व त्याचेच दुष्प परिणाम आपण भोगत आहोत एका विषाणूने जगात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशा या भीषण परिस्थीती भगवान महावीरांचे अहिंसा सत्य अपरिग्रह अस्तेय व ब्रह्मचर्य हे विचार तारक ठरणार आहे. भ. महावीरांची शिकवण अंधारातून प्रकाशाकडे, आज्ञनानून ज्ञानकडे, असत्याकडुन – सत्याकडे, नेणारी आहे.
समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी संदेश देणाऱ्या अहिंसेचे पुजारी, दृष्टे युगप्रवर्तक श्रमण भगवान महावीर स्वामिंना 2621 व्या जन्मजयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!
राजेश डुंगरवाल, लातूर.
संपर्क – 9421364462