दिनविशेष
‘ती फुलराणी’ हे पु. ल. देशपांडे लिखित नाटक स्वअभिनयाने समृद्ध करणाऱ्या मराठी नाट्य अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा आज स्मृतिदिन.
नाट्यसृष्टीबरोबर त्या आकाशवाणी आणि दूरदर्शन इथे निवेदिका म्हणूनही कार्यरत होत्या. ‘आई रिटायर होतेय’ हे त्यांचं नाटकही खूप गाजले होते. त्याचे ९५० प्रयोग झाले. पुढे 1990 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलेलं.