*आ रमेशआप्पा कराड यांनी मोठ्या उत्साहात रामेश्वर येथे बैलपोळा साजरा केला*
लातूर – शेतकऱ्याचा सखा, सर्जा – राजा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव म्हणजेच बैलपोळा. यानिमित्ताने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी त्यांच्या लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात बैलांची विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले.
बळीराजा सोबत वर्षभर राबणाऱ्या बैलांची सजावट करून डोक्याला बाशिंग, फुगे, लावून झुलीनी सजवून बैलपोळ्याच्या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी आपल्या कुटुंबासमवेत विधिवत पूजा करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला.
यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून बैलपोळा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा उत्सव मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात येतो यानिमित्ताने वर्षभर मेहनत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त केली जाते.